कुठे नेतील या वाटा मनाला....

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली

तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...

गझल: 

प्रतिसाद

तिसर्या शेरातील पहिली ओळ पुढीलप्रमाणे वाचावी
पिवळसर तावदानांवर वयाच्या

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली
पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली
शेवटचा शेर पोचत नाही असे वाटते...

अप्रतिम ग़ज़ल. अभिनंदन.
वृत्तही फारच छान ( आमचे आवडते) आहे. गुणगुणायला फारच छान.
 दिशा गातात गीते श्रावणाची .......
कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली

अप्रतिम शेर. क्या बात कही है !! तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली.... वा वा.
तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...

हा ही फारच छान शेर.  असे शेर विसरले जात नाहीत. बहोत ख़ूब. 
आपला,
(मंत्रमुग्ध) धोंडोपंत

आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

संपूर्ण गझल भावली. चिंतनीय.
- केदार पाटणकर

गझल खूप आवडली. शून्ये आणि तावदान हे शेर तर अप्रतिम!!

आहे.
- चक्रपाणि जीवन चिटणीस

पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली
वाव्वा!!  अनंत, क्या बात है! 'बिलोर काचां'प्रमाणे ह्या गझलेतील इमेजरीही लक्षणीय आहे.  'पहाडांवर उतरलेली उन्हे' हे एक आणखी उदाहरण. एखाद्या हायकूप्रमाणे तो शेर वाचला.
निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली
मतलाही खूप आवडला आणि एकंदर गझल मस्त झाली आहे.   अभिनंदन.

कुणाचे स्वप्न प्रत्यक्षात आले
पहाडांवर उन्हे बघ उतरलेली
चित्रमय शेर...देखावाच  डोळ्यांपुढे आला.
तुझी सय ठेवतिल ताजी तवानी
तुझ्या पश्चात राने बहरलेली...
क्या बात है...!

अनंतदा,
पिवळसर तावदानांवर वयाच्या
थिजुन बसलीत वर्षे ...निसटलेली
हा शेर जेव्हा ऐकतो, वाचतो.. तेव्हा हा शेर ज्या आठवणी जागवतो, त्यासाठी..
खूप खूप आणि खूप......... आठवणींची दाद..

 भाई अनंत ....
कुठे नेतील या वाटा मनाला.....
आणखी काय लिहावे? ...
खरेच अप्रतिम......
-सान्जेय

ही गझल खालील पत्त्यावर देखील वाचता येईल---

marathigazals.blogspot.com

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली
असं बर्‍याच वेळेला होतं...
 

निवारा जन्मभर देऊन गेली
चुकुन रस्त्यात झाडे गवसलेली >> क्या बात !!!

कुठे नेतील या वाटा मनाला
तुझ्या डोळ्यात शून्ये उमटलेली >>क्या बात !!!

धन्यवाद सर ! :)