गझल
आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही
घाव केले, खून नाही
हो, तशी ती क्रूर नाही
विरह भोगावा सखीचा
मेळ तिज मंजूर नाही
तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)
धडधडे पाहून तुजला
'भृंग' ते हे ऊर नाही
गझल:
दिले प्रत्येक वस्तीला अम्ही आकाश सोनेरी
जिथे जातो तिथे हाका उषेच्या वाटतो आम्ही
आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही
घाव केले, खून नाही
हो, तशी ती क्रूर नाही
विरह भोगावा सखीचा
मेळ तिज मंजूर नाही
तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)
धडधडे पाहून तुजला
'भृंग' ते हे ऊर नाही
प्रतिसाद
चित्तरंजन भट
सोम, 16/04/2007 - 13:38
Permalink
एक अश्रू पूर नाही ?
तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)
वाव्वा!
कुमार जावडेकर
सोम, 16/04/2007 - 19:20
Permalink
सुंदर
मिलिन्दपंत,
गझल (छोटी बहर) आवडली. सगळेच शेर सुंदर आहेत.
मला मतला आधी समजला नाही; पण पुन्हा वाचल्यावर-आग नाही, धूर नाही
राख होणे दूर नाही
आग आणि धूर दोन्ही नाहीसे होत चाललेत.. आता फक्त राख राहणार आहे, असा अर्थ कळला... तो फारच परिणामकारक आहे.
- कुमार
चक्रपाणि
गुरु, 19/04/2007 - 11:09
Permalink
क्या बात है/सूचना
घाव केले, खून नाही
हो, तशी ती क्रूर नाही
तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)
वावा! क्या बात है! मस्तच शेर!
एक सूचना करावीशी वाटते. गझलेतील बाकीच्या शेरांच्या तुलनेत
मेळ तिज मंजूर नाही मधले 'तिज' अगोड वाटते. त्याबाबत काही करता येईल का?
आमचाही मेळ व्हावा
हे तिला मंजूर नाही
असे केले तर चालेल का?
मिलिंद फणसे
गुरु, 19/04/2007 - 22:39
Permalink
आमचाही मेळ
आमचाही मेळ व्हावा
हे तिला मंजूर नाही
असे केले तर चालेल का?यात विरह भोगण्याची (दोन्ही अर्थाने) संकल्पना येत नाही.
विसुनाना
शुक्र, 20/04/2007 - 15:42
Permalink
गजल तर छान आहेच, शिवाय-
धडधडे पाहून तुजला
'भृंग' ते हे ऊर नाही
-हा 'मिलिंद' मक्त्यात गुंजारव करतोय. वा!
'धडधडे' ऐवजी 'गुणगुणे' वापरले असते तर?
माणिक जोशी
शुक्र, 20/04/2007 - 21:09
Permalink
मस्त !
खूपच सुन्दर गजल !
मक्ता जास्त आवडला !
ह बा
शनि, 05/06/2010 - 16:15
Permalink
तागडी दु:खास कसली ? (एक अश्रू
तागडी दु:खास कसली ?
(एक अश्रू पूर नाही ?)
अप्रतिम गझल!!!