एक फोन कर...


नको उभारू असा दुरावा एक फोन कर..!
ठरेल खोटा तुझाच दावा एक फोन कर..!

असे कशाला एकएकटे झुरायचे तू;
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर..!

नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर..!

म्हणायची हक्काने मजला, 'घरी निघुन ये..'
पुन्हा येवुदे असा बुलावा एक फोन कर..!

'क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते'
ह्या गोष्टीला काय पुरावा...? एक फोन कर..!



गझल: 

प्रतिसाद

रूपेश,
स्वागत...
छान गझल...शुभेच्छा !

नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर..!
मस्तः) मस्तच गझल आहे. फार आवडली. हिट होणार आहे.

रिंग आणि पुरावा शेर आवडले.
पु.ले.शु.!

आजच्या भाषेतली गजल.अशी रोजच्या व्यवहाराशी संबंधित गजल लिहिली गेली तर तिची पुढल्या पिढीशी आपसुकच नाळ जोडली जाईल. आगे बढो.

सुंदर गझल आहे. सगळेच शेर मनापासुन आवडले. रिंग दे तर अतिशय सुंदर.

अप्रतिम गझल. फार मजा आली. 
आज आम्ही इतक्या दिवसांनी इथे आलो आणि तुम्ही आमचा मूडच पालटून टाकलात. काय सुंदर रदीफ आहे. "एक फोन कर". वा वा.
लय भारी गझल. लय म्हणजे लयचं. शब्दचं नाहीत आपल्याकडे.
ओघवती  लेखनशैली आहे. प्रत्येक शेर अप्रतिम. तुमच्याकडून अपेक्षा फार मोठ्या आहेत.
आम्ही या गझलेवर निहायत फ़िदा आहोत.
आपला,
(प्रभावित) धोंडोपंत
आम्हाला इथे भेट द्या http://dhondopant.blogspot.com

दुमत नाही!
- चक्रपाणि जीवन चिटणीस

असे कशाला एकएकटे झुरायचे तू;
अर्धा वाटा मला मिळावा एक फोन कर..!

नकोस बोलू एक शब्दही... फक्त रिंग दे..
तुझा अबोला मला कळावा एक फोन कर..!

या गझलेवर निहायत फ़िदा...

गजल आवडली. डॉ. बेजकरांशी सहमत.
अजब

आवडला :)

सुरेख अप्रतिम

अशी हास्य  गजल  हिंदीत ही फार कमी वाचायला मिळाली
ई-मेल, मोबाईल मसेज, चटिंग आदिवरती पण लिहावी
                     धन्यवाद |
                                 -  पंकज 
                            पीएएनकेए@जीमेल.काम
  

खुप सुन्दर्,सुरेख..............................स्नेहल यादव.

आजच्या भाषेतली गजल.अशी रोजच्या व्यवहाराशी संबंधित गजल लिहिली गेली तर तिची पुढल्या पिढीशी आपसुकच नाळ जोडली जाईल. आगे बढो.
सुंदर गजल  !!!
 

रुपेशशेठ, गझल फार आवडली. अगदी मनापासून.  विशेषतः हा शेर तर अप्रतिम
'क्षणोक्षणी मी तुझी आठवण काढत असते'
ह्या गोष्टीला काय पुरावा...? एक फोन कर..!

आपला,
-(हर्षभरित) आजानुकर्ण