जन्म वाभरा

लक्षात येत आहे माझ्या जरा जरा
गंभीर जेवढा मी हा जन्म वाभरा

निष्णात पारध्याने आभाळ व्यापले
आता कुठे भरार्‍या घेशील पाखरा

का झाकला कुणी हा का झाकला असा
माझ्याच चेहर्‍याने माझाच चेहरा

मी वाटतोय हल्ली काळा तुझ्यामुळे
वाटायचे मला तू आहेस पांढरा

निष्पाप वाटणेही साधायला जमो
निष्पाप वागण्याची पेलायला धुरा

मी व्यक्त होत जाणे टाळायला हवे
कहीतरी करा हो काहीतरी करा

~वैवकु

गझल: 

प्रतिसाद

वाभरा = व्रात्य, खोडकर, टवाळ, अश्या काहीश्या अर्थाचा शब्द
शब्दकोशातला अर्थ माहीत नाही त्याबद्दल क्षमस्व

मतला विशेष आवडला.