वरून शांत शांत वाटते किती...

वरून शांत शांत वाटते किती...
मनातल्या मनात वादळे किती !

तुझी अजून वाट पाहणे किती....
क्षणाक्षणामधील ही युगे किती...

कसे कळेल काय पाहिजे तुला?
तुझे तुला खरेच समजले किती?

विरून संपतात 'शब्द' शेवटी
हवेत बोलतात माणसे किती !

बरेच सोडवून प्रश्न टाकले !
अजून या 'भ्रमात' उत्तरे किती ...

कसा प्रवास सांग व्हायचा सुरू...
तुझ्या तुझ्यामधेच अंतरे किती !

..... जयदीप

गझल: 

प्रतिसाद

कसे कळेल काय पाहिजे तुला?
तुझे तुला खरेच समजले किती?
हा शेर आवडला.

बरेच सोडवून प्रश्न टाकले !
अजून या 'भ्रमात' उत्तरे किती ...
वा. छान.
बाकी 'विरुन संपणे' नवे आहे. 'विरुन जाणे' माहीत होते. एकंदर छान.

पहिले तीन शेर छान आलेले आहेत.

कसे कळेल काय पाहिजे तुला?
तुझे तुला खरेच समजले किती?

बरेच सोडवून प्रश्न टाकले !
अजून या 'भ्रमात' उत्तरे किती ...

आवडले. मस्त.