मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो

सुखान्त गोष्टी रोज नव्या मी जुळवत बसतो
एक उदासी रोज रोज ओलांडत बसतो

`असेच होइल' घालताच समजूत मनाची
मी सुध्दा मग `तसेच होइल' समजत बसतो

देणे असते अखेर या डोळ्यांचे काही
मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो

कुठेतरी असणार रात्र.. तुटणारा तारा
दिवसासुध्दा मनात काही बोलत बसतो

चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो

कुणीतरी येताच जाग डोकावत असते
रात्र रात्र सगळा कोलाहल खोडत बसतो

गझल: 

प्रतिसाद

मी काही स्वप्नांच्या नुसता सोबत बसतो
वा..

चित्रामधले घर एखादे अबोल असते
खुळ्यासारखा तेच दार ठोठावत बसतो
वाव्वा.

प्रसाद, छान गझल.

धन्यवाद :)

मस्त गझल सर.... धन्यवाद.. :)

एक उदासी रोज रोज ओलांडत बसतो>> हा मिसरा खूप आवडला!!!!!!! :)

वा. चांगली गझल वर काढलीत.

मस्तच गझल, आवडली.

एक उदासी ही ओळ अप्रतिम! चित्रामधले घर, असेच होईल हे शेर खास!