हा स्वत्वाचा तपास मानू आता
गझल - हा स्वत्वाचा तपास मानू आता
हा स्वत्वाचा तपास मानू आता
चल देहाला लिबास मानू आता
जेथे तेथे 'मी'च आडवा येतो
हे कळणेही विकास मानू आता
लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता
टोल फक्त मरणाचा द्यावा लागे
जन्माला बायपास मानू आता
केव्हाची आनंदी वाटत आहे
मनस्थितीला उदास मानू आता
ह्या वाटेवर एकटाच आहे मी
माझ्याइतके कुणास मानू आता
सर्व फुलांचे देठ सारखे होते
हा कोणाचा सुवास मानू आता
उगीच काहीतरी बघू जमते का
अंधाराला भकास मानू आता
पूर्वी आई दार उघडण्या जागे
त्यास पोरका प्रयास मानू आता
शिकायचे ते शिकून झाल्यावरती
'बेफिकीर'ला कशास मानू आता
-'बेफिकीर'!
गझल:
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 08/10/2014 - 01:24
Permalink
लिहायचे ते लिहिता आले नाही
लिहायचे ते लिहिता आले नाही
आयुष्याला समास मानू आता
ह्या वाटेवर एकटाच आहे मी
माझ्याइतके कुणास मानू आता
वाव्वा. दोन्ही शेर भयंकर आवडले. मतलाही मस्त. एकंदर गझल आवडलीच.
वैभव वसंतराव कु...
बुध, 08/10/2014 - 15:21
Permalink
खूप आवडली
खूप आवडली