पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
देणग्यांच्या जाहिराती झाकती आता कळस
सोडली देवास कन्या, पूत्र दे देवा म्हणत
त्या मुलीला पूत्र झाला, देव चुकला की नवस
आणले आहेत आपण खुद्द......हे दुर्लक्षुनी
बोलतो प्रत्येकजण की काय हे आले दिवस
पोलक्याची पाठ खेचे सभ्यतेला खालती
चेहर्याचा राग बोले बघ मवाल्याची हवस
ह्या समाजाला स्वतःची आसवे पुरतात की
पावसाला सांग मित्रा तू हवे तेव्हा बरस
मन असे का तडफडे हे तू विचारावेस ना
का दुराव्याची कधीही टोचली नाहीस लस
गुंतलो शोधात इतका की कळेना हे मला
पौर्णिमा होती हवी की पाहिजे होती अवस
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस
का इथेसुद्धा असा अस्वस्थसा आहेस तू
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस
मनगटे देतील पाठिंबा तुला तेव्हाच ही
सापडावी लागते मुर्दाड लोकांचीच नस
हेच हे अभ्यासण्यामध्ये निघाला जन्म हा
हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस
छान गझलेचा निकष इतकाच आहे राहिला
कस जगाचा लागतो अन् 'बेफिकिर' लिहितो सकस
-'बेफिकीर'!
प्रतिसाद
चित्तरंजन भट
बुध, 16/07/2014 - 14:19
Permalink
छान आहे. तूर्तास सरस आणि मतला
छान आहे. तूर्तास सरस आणि मतला भावले.
विजय दि. पाटील
बुध, 16/07/2014 - 14:23
Permalink
दोन रस्ते राहिले आहेत
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस
मस्त
केदार पाटणकर
बुध, 16/07/2014 - 15:47
Permalink
गुंतलो शोधात इतका की कळेना हे
गुंतलो शोधात इतका की कळेना हे मला
पौर्णिमा होती हवी की पाहिजे होती अवस
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस
का इथेसुद्धा असा अस्वस्थसा आहेस तू
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस
हे शेर आवडले ! घराचा शेर तर अगदी सहज आहे.
आणले आहेत आपण खुद्द......हे दुर्लक्षुनी
बोलतो प्रत्येकजण की काय हे आले दिवस
भूषण, अशा पध्दतीच्या शेरांसंदर्भात चर्चेसाठी एक विचार ः या शेरात खुद्द या शब्दापाशी एक अर्थ संपत आहे व त्याच ओळीत शेवटचे दोन शब्द खालच्या ओळीचा भाग म्हणून येत आहेत. शक्यतो पहिल्या ओळीच्या अखेरीस ओळीची सार्थकता संपावी. मध्येच संपू नये. मध्येच संपल्यास खालच्या ओळीशी संबंधित शब्द वर येतात. असे होणे वाचायला,लय पकडायला, अर्थबोध व्हायला तितकेसे सुखद नाही, नसावे. असे शेर तुझ्या आधीच्याही काही गझलांमध्ये आलेले होते.
विचार प्रकर्षाने मनात आला म्हणून मांडला.
वैभव वसंतराव कु...
सोम, 21/07/2014 - 14:50
Permalink
खुद्द आपण आणले आहेत हे
खुद्द आपण आणले आहेत हे दुर्लक्षुनी .....
.........असे बेफीजी करू शकतात पण ओळ सुचताना यतिस्थानाचा विचार त्यांच्या हातून झाला असावा त्यामुळे ती ओळ तशी आली असे वाटते पण काहीही बिघडतही नाही फारसे
असो !
नस च्या शेरातला च खटकला
पण सगळे शेर छानच आहेत
धन्यवाद
गंगाधर मुटे
गुरु, 31/07/2014 - 14:00
Permalink
पायथा बांधायला आधार नव्हता
पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
देणग्यांच्या जाहिराती झाकती आता कळस
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस
हेच हे अभ्यासण्यामध्ये निघाला जन्म हा
हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस
बढिया शेर!
Akshara Surase
गुरु, 21/08/2014 - 12:51
Permalink
Saglech Sher Awadale.........
Saglech Sher Awadale.............. Visheshta...........
पायथा बांधायला आधार नव्हता जोरकस
देणग्यांच्या जाहिराती झाकती आता कळस
Ani
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस
Mast....Abhinanadan
supriya.jadhav7
सोम, 25/08/2014 - 11:49
Permalink
Samajik aashayacjhe sher
Samajik aashayacjhe sher hatke ani aatwar pohochanare watale. Bhidale.
मन असे का तडफडे हे तू विचारावेस ना
का दुराव्याची कधीही टोचली नाहीस लस.....Aaah !
गुंतलो शोधात इतका की कळेना हे मला
पौर्णिमा होती हवी की पाहिजे होती अवस.....kharay !
दोन रस्ते राहिले आहेत दोघांच्यापुढे
मी इथे जाऊन फसतो तू तिथे जाऊन फस.....aaart !
का इथेसुद्धा असा अस्वस्थसा आहेस तू
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस...aaai ga !!
मनगटे देतील पाठिंबा तुला तेव्हाच ही
सापडावी लागते मुर्दाड लोकांचीच नस.... sahi farmaya !
हेच हे अभ्यासण्यामध्ये निघाला जन्म हा
हा सरस की तो सरस की तो सरस की तो सरस.... :)
छान गझलेचा निकष इतकाच आहे राहिला
कस जगाचा लागतो अन् 'बेफिकिर' लिहितो सकस....kyaa baat !
S A L A M !
बाळ पाटील
बुध, 24/09/2014 - 12:20
Permalink
>> का इथेसुद्धा असा अस्वस्थसा
>> का इथेसुद्धा असा अस्वस्थसा आहेस तू
घर तुझे आहे स्वतःचे तर जरा टेकून बस
छानंच ! वास्तवाचे भान जपतानाच हलक्याशा विनोद्बुद्धीची फोडणी !! मला तर शिंकच आली. गझलकाराचा कॉमन टच वाखाणण्यासारखा.