अबोल

प्रार्थनेस काय ढोल पाहिजे
पोचला नभात बोल पाहिजे

चेह-यावरील दु:ख मोजण्या
घाव काळजात खोल पाहिजे

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे

दोर काचतोय जीवना तुझा
सावरावयास तोल पाहिजे

बोल कागदावरी हवा तसा
एरवी कवी अबोल पाहिजे

--डॉ.कैलास गायकवाड

गझल: 

प्रतिसाद

धाय मोकलीत आसवे नको
फक्त पापणीत ओल पाहिजे

वा

एरवी कवी अबोल पाहिजे - हा हा हा, 'बोलबच्चन'गिरी ही माणसाची खोड असते मग तो कवी असो, कादंबरीकार किंवा सामान्य माणूस.

आवडली गझल. काफियांचा छान वापर केलेला आहे. शेवटच्या शेरामुळे एक सुंदर दृष्य तरळून जात आहे.

काचतोय ऐवजी काचतोच असा बदल कसा वाटतो?

खूप आवडली गझल