गझल

थांबते जराशी ट्रेन पुन्हा धडधडते
हे उदास खेडे वाट कुणाची बघते

तापला सभोती रानमाळ वैशाखी
वार्‍यावर उगाच फूल तुझे लवलवते

कौलारू रंग मनावर चढतो इतका
कोसळते बरेच, किंचित मागे उरते

हे प्रेम म्हणू की निव्वळ खेळ मनाचा
ही नदी खळाळुन येते मग ओसरते

मी नवेपणाचे सोंग घेउनी निघतो
पोचतो जिथे वहिवाट जुनी सापडते

अनंत ढवळे

गझल: 

प्रतिसाद

वा. क्या बात है. मस्त गझल. सगळेच शेर आवडले.

Excellent Gazal, as always.

व्वा, सगळेच शेर आवडले.

खूप आवडली गझल
उगाच आणि बरेच ह्या शब्दांपाशी लयीसाठी किंचित अडखळलो चूक माझीच असेलही

आपली गझल वाचायला मिळणे हा परमानंद असतो
धन्यवाद सर

vaa.. masta gazal...khup avadli..

पहिला शेर खास ढवळे टच
सगळी गझल सुरेखच :)

मस्त.. आवडली !!

छान.

मी नवेपणाचे सोंग घेउनी निघतो
पोचतो जिथे वहिवाट जुनी सापडते...

क्या बात है..

कौलारू रंग मनावर चढतो इतका
कोसळते बरेच, किंचित मागे उरते

हे प्रेम म्हणू की निव्वळ खेळ मनाचा
ही नदी खळाळुन येते मग ओसरते

मी नवेपणाचे सोंग घेउनी निघतो
पोचतो जिथे वहिवाट जुनी सापडते

classic ! eekahun eek !!

pahile donhihi awadale !!

gazalach class !

dhanywad !!

हे प्रेम म्हणू की निव्वळ खेळ मनाचा
ही नदी खळाळुन येते मग ओसरते

मी नवेपणाचे सोंग घेउनी निघतो
पोचतो जिथे वहिवाट जुनी सापडते

हे दोन शेर फार छान वाटले.

**** मात्र, ट्रेन खटखटकली.

सुंदर गझल सर..

थांबते जराशी ट्रेन पुन्हा धडधडते
हे उदास खेडे वाट कुणाची बघते >>

कौलारू रंग मनावर चढतो इतका
कोसळते बरेच, किंचित मागे उरते >>

हे दोन शेर सगळ्यात जास्त आवडले सर :)

धन्यवाद :)

सुंदर गझल.