तुझे स्वच्छ हासू झळाळी उन्हाची...

तुझे स्वच्छ हासू झळाळी उन्हाची
नजर होत जाते डहाळी उन्हाची

बिलगते तुला ते कुठेही कसेही
तुला चालते ही टवाळी उन्हाची

कशानेच जी खोडता येत नाही
अशी एक रेषा कपाळी उन्हाची

बसुन उंबऱ्याशी सकाळी सकाळी
किती प्यायचो मी शहाळी उन्हाची

कुणी पाहिली का कुणाच्या नशीबी
अशी बारमाही दिवाळी उन्हाची

महापूर आले किती सावल्यांचे
जशीच्या तशीही लव्हाळी उन्हाची

गगन सांडलेले रुपेरी सरोवर
चमकते जशी एक थाळी उन्हाची

तुझी आणि माझी उन्हे एक झाली
रुपे राहिली ना निराळी उन्हाची

तिला दागिन्यांचा मुळी सोस नाही
तिला छान आहे झळाळी उन्हाची

- वैभव देशमुख

गझल: 

प्रतिसाद

एकच शब्द... वा !

तुझी आणि माझी उन्हे एक झाली
रुपे राहिली ना निराळी उन्हाची
वाह !

नजर होत जाते डहाळी उन्हाची

कशानेच जी खोडता येत नाही
अशी एक रेषा कपाळी उन्हाची

बसुन उंबऱ्याशी सकाळी सकाळी
किती प्यायचो मी शहाळी उन्हाची
वा. मस्त. तसे सगळेच शेर चांगले झाले आहेत.

महापूर आले किती सावल्यांचे
जशीच्या तशीही लव्हाळी उन्हाची
हा शेर फारच छान !

कशानेच जी खोडता येत नाही
अशी एक रेषा कपाळी उन्हाची

महापूर आले किती सावल्यांचे
जशीच्या तशीही लव्हाळी उन्हाची

सुरेख गझल. वरील दोन विशेष

तुझी आणि माझी उन्हे एक झाली
रुपे राहिली ना निराळी उन्हाची

आवडला.

mast .. maja aali!!

बिलगते तुला ते कुठेही कसेही
तुला चालते ही टवाळी उन्हाची

व्वा..

>>>
ृृकुणी पाहिली का कुणाच्या नशीबी
अशी बारमाही दिवाळी उन्हाची हा शेर
विदर्भात आली पहा बेहिशेबी
अशी बारमाही दिवाळी उन्हाची
असा... गंमत म्हणून वाचला.

sarvanche khup khup aabhar !!!

तुझे स्वच्छ हासू झळाळी उन्हाची
नजर होत जाते डहाळी उन्हाची

बिलगते तुला ते कुठेही कसेही
तुला चालते ही टवाळी उन्हाची

गझल आवडली !

गझल आवडली ..