ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली

ज्या क्षणी मी थांबलो, ती थांबली
सावलीने साथ नाही सोडली

स्वप्न माझे जागलेले रात्रभर
अन् पहाटे झोप येऊ लागली

लोपल्या पाऊलवाटा शेवटी
का तुझी माझ्यात वर्दळ थांबली

लागुदे जर ऊन आहे लागते
सावलीमध्ये हरवते सावली

रोज आकाशात तारा जन्मतो
काजव्याने कात असते टाकली

जयदीप

गझल: 

प्रतिसाद

माफ करा, जन्मतो असे आहे, जन्मतिथि नाही

लागुदे जर ऊन आहे लागते
सावलीमध्ये हरवते सावली

व्वा.

स्वप्न माझे जागलेले रात्रभर
अन् पहाटे झोप येऊ लागली
वा. मस्त. 'वर्दळ'ही आवडली. हरवणाऱ्या सावलीचा शेर पुरता उकलला नाही. पण त्यात प्रॉमिस वाटले. दुसरी ओळ छान आहे. बाकी काजव्याचे कात टाकणे नवीनच. पण तूर्तास अपील झालेले नाही.

सर, काजवा : एखाद्या क्षेत्रातील नवशिका, तारा : त्या क्षेत्रातील दिग्गज.

कात टाकणे : नवशिक्याने एक पातळी पार करताना स्वतःत घडवलेला बदल

असे मला म्हणायचे होते

ते शेरातून आले नसेल कदाचित

क्षमस्व.