तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते

तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते

कुणीही दाखवा.....आम्ही तिचा सत्कार ठेवू
नदी......जी सागरापाशी मनापासून जाते

तिच्या संधीप्रमाणे वागण्याचा राग येतो
कधी येथून जाते ती कधी तेथून जाते

तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते

तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते

कुणाला दु:ख होते ऐकुनी माझी स्थिती अन्
मला माहीत आहे कोण आनंदून जाते

कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते

कशाचा अर्थ आहे काय काहीही कळेना
स्वतःशी हासते किंवा मला हासून जाते

शरीराला टिकवणे एवढे कर्तव्य आहे
सुरू होते तिथे आयुष्य हे संपून जाते

जगाला सांग...... वाचव खर्च तू मद्यालयाचा
मला रोखायला येते...... मला पाजून जाते

किती वर्षे प्रतीक्षा चालली आहे तिची ही
म्हणाली 'बेफिकिर' जी "मी उद्या येऊन जाते"

-'बेफिकीर'!

गझल: 

प्रतिसाद

तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते
वा. वरची ओळ फारच मस्त.

कुणाला दु:ख होते ऐकुनी माझी स्थिती अन्
मला माहीत आहे कोण आनंदून जाते
:)

एकंदर छानच आहे गझल.

कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते

नदी जी सागरापाशी मनापासून जाते

कशाचा अर्थ आहे काय काहीही कळेना
स्वतःशी हासते किंवा मला हासून जाते

मला रोखायला येते मला पाजून जाते

मस्त!

तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते

हा शेर मस्त.

तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते

कुणाला दु:ख होते ऐकुनी माझी स्थिती अन्
मला माहीत आहे कोण आनंदून जाते

क्या बात!

सर्व शेर आवडले

तुझे आच्छादलेले जग मला सांगून जाते
कुणाची सावली जाते, कुणाचे ऊन जाते>>

तिच्या संधीप्रमाणे वागण्याचा राग येतो
कधी येथून जाते ती कधी तेथून जाते>>

जगाला सांग...... वाचव खर्च तू मद्यालयाचा
मला रोखायला येते...... मला पाजून जाते>>

या वेळी वाचली तेव्हा हे शेर खूप आवडले... :)

कशाचा अर्थ आहे काय काहीही कळेना
स्वतःशी हासते किंवा मला हासून जाते

हा फारच आवडला :)

तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते

वाह..

कशाचा अर्थ आहे काय काहीही कळेना
स्वतःशी हासते किंवा मला हासून जाते
मी हा शेर नव्याने वाचला. मजा आली.

तश्या जातात काही पालख्या दुर्लक्षिलेल्या
जसे आयुष्य हे माझे तुझ्यावाचून जाते.... आह !

तुम्हाला येत नाही का अशी अडचण कधीही
जिथे जाऊ नये हे मन तिथे हटकून जाते.... क्या बात ! क्या बात !

कधी येईल यंदाचा...... कुठे सांगून गेले
कृतघ्नासारखे का वागले मॉन्सून जाते........ ह्म्न !

शरीराला टिकवणे एवढे कर्तव्य आहे
सुरू होते तिथे आयुष्य हे संपून जाते......खरय !

किती वर्षे प्रतीक्षा चालली आहे तिची ही
म्हणाली 'बेफिकिर' जी "मी उद्या येऊन जाते"....आह !

आवडली गझल ,

धन्यवाद !!