मी तुझा,तुझा असेन आमरण
संशया करु नकोस आक्रमण
मी तुझा,तुझा असेन आमरण
सांगतो मनास, ”विसरलो तुला”
हीच तर तुझी मुळात आठवण
फ़ुंकणे,पिणे असभ्य वाटले
आजकाल हेच सभ्य आचरण
हासण्यास माझिया फ़सू नका
हासणे मुखावरील आवरण
बोलवे कुणी,तिथे न जायचो
पोचलो तिथे,जिथे न आवतण.
डॉ.कैलास गायकवाड
गझल:
प्रतिसाद
विद्यानंद हाडके
गुरु, 04/08/2011 - 17:09
Permalink
बोलवे कुणी,तिथे न जायचो पोचलो
बोलवे कुणी,तिथे न जायचो
पोचलो तिथे,जिथे न आवतण...... वाह कैलासजी
देवराज
बुध, 10/08/2011 - 15:49
Permalink
संशया करु नकोस आक्रमण मी
संशया करु नकोस आक्रमण
मी तुझा,तुझा असेन आमरण
सांगतो मनास, ”विसरलो तुला”
हीच तर तुझी मुळात आठवण
छान ....अप्रतिम....
गंगाधर मुटे
शनि, 27/08/2011 - 07:16
Permalink
बोलवे कुणी,तिथे न जायचो पोचलो
बोलवे कुणी,तिथे न जायचो
पोचलो तिथे,जिथे न आवतण.
आवडला.
"कैलासा"विना गझल अपूर्ण वाटली.
नेहा
बुध, 31/08/2011 - 23:01
Permalink
फ़ुंकणे,पिणे असभ्य
फ़ुंकणे,पिणे असभ्य वाटले
आजकाल हेच सभ्य आचरण
हासण्यास माझिया फ़सू नका
हासणे मुखावरील आवरण
हे दोन शेर आवडले..
पण , शेवटचा शेर समजला नाही ...
अनिल रत्नाकर
गुरु, 22/09/2011 - 23:13
Permalink
vah. kya bat hai|
vah. kya bat hai|
अमोल क्षिरसागर
सोम, 10/10/2011 - 17:04
Permalink
संशया करु नकोस आक्रमण मी
संशया करु नकोस आक्रमण
मी तुझा,तुझा असेन आमरण
खूप छान!