फिरून यायचे इथे टळेल का कधी?
तुझे तुलाच सत्य हे, कळेल का कधी?
फिरून यायचे इथे, टळेल का कधी?
खुशाल फेक रोज घाण त्यामधे नवी
अखंड वाहता झरा मळेल का कधी?
नभाहुनी धराच ज्यास्त ओढ लावते
म्हणून पान कोवळे गळेल का कधी?
तुझ्या कथेमधे अमूल्य अर्थ आढळे
उगाच हा समाज कळवळेल का कधी?
कुकर्म आमचेच मात्र दूषणे तुला
शनी तुझे नशीब फळफळेल का कधी?
सदैव टाकतोस तू जपून पावले
तुझा ठसा धुळीत आढळेल का कधी?
गढूळता अशी कधी कुठे न पाहिली
अश्या मनात चंद्र विरघळेल का कधी?
फटी अनेक ठेवल्यास ओंजळीस तू
सुखासुखीच ज्योत तळमळेल का कधी?
दिलीस जी व्यथा तिलाच फूल मानले
म्हणून ती सदैव दर्वळेल का कधी?
मना तुला हवे तसे घडेल का कधी?
कळेलही तुल परी वळेल का कधी?
गझल:
प्रतिसाद
शाम
मंगळ, 16/08/2011 - 19:32
Permalink
काय म्हणू ...क्या ब्बात....
काय म्हणू ...क्या ब्बात.... क्या ब्बात ...क्या ब्बात!!!!!!
sindhuraj
बुध, 17/08/2011 - 02:25
Permalink
खुशाल फेक रोज घाण त्यामधे
खुशाल फेक रोज घाण त्यामधे नवी
अखंड वाहता झरा मळेल का कधी?
हा शेर आवडला ...... तशी पूर्ण गझल फार छान आहे ......
गंगाधर मुटे
शनि, 27/08/2011 - 07:07
Permalink
कुकर्म आमचेच मात्र दूषणे
कुकर्म आमचेच मात्र दूषणे तुला
शनी तुझे नशीब फळफळेल का कधी?
-
सदैव टाकतोस तू जपून पावले
तुझा ठसा धुळीत आढळेल का कधी?
हे दोन जास्त आवडले.
sonali rasik
शुक्र, 24/02/2012 - 11:50
Permalink
khup chan... frirun yayche
khup chan... frirun yayche tale ka kadhi??
dhananjay44
बुध, 23/07/2014 - 18:28
Permalink
wonderful ..!!
wonderful ..!!