आवश्यक !

========================

आयुष्याला कुठल्याही द्रावाने भरणे आवश्यक
दु:खाइतके नाही आता दु:ख विसरणे आवश्यक

कुठल्या कुठल्या संदर्भांना जडला आहे गंध तुझा
जगता जगता काही श्वासांचे गुदमरणे आवश्यक

शब्दांनी कळणारच नाही अर्थ तुला तारुण्याचा
इथल्या मोहक वळणांवरती पाय घसरणे आवश्यक

प्रेमाइतके सोपे उत्तर होते माझ्या हाताशी
जेव्हा वाटत होती मज भलती समिकरणे आवश्यक

तुकडे तुकडे वेचत राहू कुठवर अवघ्या जगण्याचे
त्यापेक्षा हे तुटलेपण आता पत्करणे आवश्यक

येणार्‍या वर्षांचा वारा सोसत नाही स्वप्नांना
जगण्याभवती तू हातांची ओंजळ धरणे आवश्यक

दुनिया ना बघताही तो हे खात्रीने सांगत असतो-
- की कुठल्या ग्रंथामधली कुठली अवतरणे आवश्यक !

कळले आता साधत नाही या अश्रूंनी काहीही..
झाले आहे डोळ्यांमध्ये रक्त उतरणे आवश्यक !

-ज्ञानेश.
============================

गझल: 

प्रतिसाद

वा. मस्त. संपूर्ण गझल अगदी आवडली.

आयुष्याला कुठल्याही द्रावाने भरणे आवश्यक
दु:खाइतके नाही आता दु:ख विसरणे आवश्यक

वाव्वा.

कुठल्या कुठल्या संदर्भांना जडला आहे गंध तुझा
जगता जगता काही श्वासांचे गुदमरणे आवश्यक

क्या बात है. पहिले चारही शेर अतिशय आवडले.

पुन्हा एकदा मास्टरपीस.

गझला येती,येत रहाती,निरंत या पटलावरती
तयात ज्ञानेशी गझलांचे रंग उधळणे आवश्यक

गझल आवडली .

सर्वांशी सहमत! उत्तम गझलेचे उदाहरण!

(कैलासराव - तुमचा काफिया चुकला की?? गंमतीने म्हणतोय, शेर आवडलाच)

:-)

क्य बात हे !!!!!!!!
संपूर्ण गझल खुप आवडली.

तुकडे तुकडे वेचत राहू कुठवर अवघ्या जगण्याचे
त्यापेक्षा हे तुटलेपण आता पत्करणे आवश्यक

येणार्‍या वर्षांचा वारा सोसत नाही स्वप्नांना
जगण्याभवती तू हातांची ओंजळ धरणे आवश्यक

कळले आता साधत नाही या अश्रूंनी काहीही..
झाले आहे डोळ्यांमध्ये रक्त उतरणे आवश्यक !

भिडली गझल....

एक उच्च गझल.
तुझ्या गझला गझलविश्वात आवश्यक.

शब्दांनी कळणारच नाही अर्थ तुला तारुण्याचा
इथल्या मोहक वळणांवरती पाय घसरणे आवश्यक

वा, सुरेख

वा मस्त गझल
शब्दांनी कळणारच नाही अर्थ तुला तारुण्याचा
इथल्या मोहक वळणांवरती पाय घसरणे आवश्यक

प्रेमाइतके सोपे उत्तर होते माझ्या हाताशी
जेव्हा वाटत होती मज भलती समिकरणे आवश्यक

तुकडे तुकडे वेचत राहू कुठवर अवघ्या जगण्याचे
त्यापेक्षा हे तुटलेपण आता पत्करणे आवश्यक
एकाहून एक सरस आहेत हे शेर..

अप्रतिम,

शिकायला मिळावे अशी गझल!!

अवतरणे आणि रक्त उतरणे हे दोन शेर मस्त जमलेत, आवडले

ओ हो

जगता जगता काही श्वासांचे गुदमरणे आवश्यक

फारच छान

येणार्‍या वर्षांचा वारा सोसत नाही स्वप्नांना
जगण्याभवती तू हातांची ओंजळ धरणे आवश्यक..

संपूर्ण गझल आवडली.

ज्ञानेष, काय गझल झाली आहे, व्वा! शेवटचा शेर वाचून गालिबची आठवतो.

रग़ो में दौडते फिरने के हम नहीं क़ायल
जब आंख से ही न टपका तो फिर लहू क्या है?

kyaa bat hai! matalaa sodalaa tar sagale sher ekase ek.

कुठल्या कुठल्या संदर्भांना जडला आहे गंध तुझा
जगता जगता काही श्वासांचे गुदमरणे आवश्यक

क्या बात है.