मी जिथे नाही अशी जागाच नाही

मी जिथे नाही अशी जागाच नाही
प्रश्न 'मी आहे कुठे' इतकाच नाही

बाप या दुनियेत, आकाशात आई
मी गझल आहे जिचा मतलाच नाही

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

हा कुठे पोचेल ही चिंता जगाला
देउया आधार ही भाषाच नाही

लाख भोंदू गाडती नामोनिशाणी
रोज आठवणार मी... शंकाच नाही

गझल: 

प्रतिसाद

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

वाह!!!

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

अफाट शेर..

बाप या दुनियेत, आकाशात आई
मी गझल आहे जिचा मतलाच नाही

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

हा कुठे पोचेल ही चिंता जगाला
देउया आधार ही भाषाच नाही

आवडलेत.

सुरेख गझल.
शेवट्चे चारही शेर आवडले.

लाख भोंदू गाडती नामोनिशाणी
रोज आठवणार मी... शंकाच नाही

वा..!
-------------------------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

मस्त!!!!!!

फारच छान! सगळे शेर अव्वल!

बाप या दुनियेत, आकाशात आई
मी गझल आहे जिचा मतलाच नाही ..... बहोत दर्द है भुषणजी

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही ...... क्या बात है

हा कुठे पोचेल ही चिंता जगाला
देउया आधार ही भाषाच नाही ......... दुनियादारी है भैय्या
मस्त गझल...

अप्रतिम.

मी गझल आहे जिचा मतलाच नाही.... छान कल्पना.
आकाशात असो की जमिनीवर दोन्ही मिसरे असताना.. मतला?

सगळे आवडले... मस्त.

लोक अस्तित्वामुळे दु:खात सारे
जन्मला नाहीच त्याला जाच नाही

फार चांगला शेर. फार आवडला. आणि एकंदर गझलही