तू भेटली नव्हतीस तोवर

तू भेटली नव्हतीस तोवर चालले होते बरे
लक्षात नाही यायचे तेव्हा मनावरचे चरे

आपण जिथे भेटायचो ही त्या पुलाचीही व्यथा
चिक्कार पाणी वाहिले उरले तरीही भोवरे

ईमेल, एसेमेस येती रोज पाचोळ्यापरी
गेली कुठे गंधाळलेली ती जुनी पत्रोत्तरे?

झालो तिच्या प्रेमात जाळीदार पिंपळपान मी
अन् ती म्हणे ठेवू कशाला आठवांची लक्तरे?

कुठल्या विचारांची तुझ्या डोक्यात दंगल माजली?
उध्वस्त झाल्या कल्पना नुसतीच उरली अक्षरे

तो श्वास होता कोणता गळफास ज्याने लावला?
तो भास नक्की कोणता... मी मानले ज्याला खरे?

मी कोण? का आलो इथे? जाणार कोठे शेवटी?
पडतात असले प्रश्न का?... छळतात ज्यांची उत्तरे

गझल: 

प्रतिसाद

मिल्याराव,

वा ! बहोत खूब !
कुठला शेर मनात घोळवू, असे झाले आहे.
हे असेच तुम्हाला सुचू दे आणि आम्हाला वाचायला मिळू दे.
लोक लिहितात आणि वाचणारा हवीहवीशी वेदना जगत राहतो.

आपण जिथे भेटायचो ही त्या पुलाचीही व्यथा
चिक्कार पाणी वाहिले उरले तरीही भोवरे

झालो तिच्या प्रेमात जाळीदार पिंपळपान मी
अन् ती म्हणे ठेवू कशाला आठवांची लक्तरे?

मी कोण? का आलो इथे? जाणार कोठे शेवटी?
पडतात असले प्रश्न का?... छळतात ज्यांची उत्तरे

क्या लि़ख्खा यार जिओ...

झकास राव!
खालील शेर मस्तच.

तो श्वास होता कोणता गळफास ज्याने लावला?
तो भास नक्की कोणता... मी मानले ज्याला खरे?

मी कोण? का आलो इथे? जाणार कोठे शेवटी?
पडतात असले प्रश्न का?... छळतात ज्यांची उत्तरे

---------------------------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

धन्यवाद मित्रांनो

पुलाची व्यथा आणि जाळीदार पिंपळपान ! वाह दोन्ही शेर आवडले.

मी कोण? का आलो इथे? जाणार कोठे शेवटी?
पडतात असले प्रश्न का?... छळतात ज्यांची उत्तरे

वाव्वा. अगदी सहज आणि सुरेख. जाळीदार पान, पुलाची व्यथा, डोक्यात दंगल माजणेही आवडले. एकंदर चांगली झाली आहे गझल.

सुरेख, मनव्यापक गझल.

झालो तिच्या प्रेमात जाळीदार पिंपळपान मी
अन् ती म्हणे ठेवू कशाला आठवांची लक्तरे?

कुठल्या विचारांची तुझ्या डोक्यात दंगल माजली?
उध्वस्त झाल्या कल्पना नुसतीच उरली अक्षरे

सगळी गझल सुंदर आहे!!!!
नमुद विशेष आवडले..

मतला आणि शेवटचा फार आवडला...
गझल उत्तमच....

चरे, भोवरे, लक्तरे

खास आवडलेत.

झालो तिच्या प्रेमात जाळीदार पिंपळपान मी
अन् ती म्हणे ठेवू कशाला आठवांची लक्तरे?

सुंदर! गझल आवडली.

पुलाच खरच खुप मस्त आहे...

सुंदर गझल आहे !!!