मी एकटाच येथे माझ्या जगात आहे

मी एकटाच येथे माझ्या जगात आहे
काळोख जो जगाचा, माझी प्रभात आहे

आताच मैफलीचा मी वर्ज्य सूर झालो
माझ्याशिवाय गाणे तालासुरात आहे

गेलो निघून डोळे ठेवून कोरडे मी
माझ्याच आसवांचे पाणी घनात आहे

गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्‍या कशात आहे

खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात आहे

-- मी अभिजीत

गझल: 

प्रतिसाद

आताच मैफलीचा मी वर्ज्य सूर झालो
माझ्याशिवाय गाणे तालासुरात आहे

वा.. माझ्याशिवाय गाणे तालासुरात आहे.

गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्‍या कशात आहे

वा... सांगात तरी नशा ही दुसऱ्या कशात आहे.
एकंदर छान ओघवते लिहिता.

छानच! सहमत आहे.

मला शेवटचा शेरही आवडला.

गेलो निघून डोळे ठेवून कोरडे मी
माझ्याच आसवांचे पाणी घनात आहे

गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्‍या कशात आहे

खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात आहे

शेर आवडले

वाहवा अभिजीत..क्या बात है!!!

छान !
पहिले चार शेर खुप आवडले.
रामकुमार.

गोंजारतो अताशा माझ्याच वेदना मी
सांगा तरी नशा ही दुसर्‍या कशात आहे

खेळात या नव्याने माझ्यात जन्मतो मी
माझ्या शहास अंती माझीच मात आहे

-- क्या बात है अभिजीत व्वा.

आताच मैफलीचा मी वर्ज्य सूर झालो
माझ्याशिवाय गाणे तालासुरात आहे
वा!

वाहवा, क्या बात है !!

संपुर्ण गझल अप्रतीम झालिये