नकार आहे
तुला न मी पाहिले तरीही मनात श्रद्धा अपार आहे
तुझ्याविना या जगात माझा जगावयाला नकार आहे
सदैव काट्यांत गुंतलेल्या, उजाडलेल्या विराण बागा
अजाणता मोहरून आल्या, तुझ्यामुळे ही बहार आहे!
तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे
मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!
मला जराही कळू न देता लुटून नेलेस गाव माझे,
पिसाट दैवा, तुझ्या छडीचा अखेरचा हा प्रहार आहे
कसे, किती शोधले, कुठेही तपास ज्याचा नसे कुणाला,
असा निराकार सावळा श्रीहरी मला भेटणार आहे!
गझल:
प्रतिसाद
शाम
गुरु, 27/01/2011 - 20:53
Permalink
तुझ्या मनाच्या जुन्या
तुझ्या मनाच्या जुन्या व्रणांनी कसे भरावे? कसे सुकावे?
अजून तो बोलतोच, त्याच्या हरेक शब्दास धार आहे........खूपच धार धार!!!!
चित्तरंजन भट
बुध, 02/02/2011 - 15:26
Permalink
मुक्या कळ्यांचा दबून गेला
मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!
वाव्वा! फार आवडले. विशेषतः खालची ओळ. एकंदर गझल छान आहे. भक्तिगीतासारखी ही भक्तीगझल म्हणता येईल.
मी अभिजीत
बुध, 16/02/2011 - 16:31
Permalink
मुक्या कळ्यांचा दबून गेला
मुक्या कळ्यांचा दबून गेला अखेरचा श्वास एकदाचा,
लुटायचे तेवढे लुटू या, नवीन अत्तर तयार आहे!
जबरदस्त शेर
ही गझल पण तुमच्याकडून ऐकताना फार मजा आली..!