या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना

या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना
तुझ्याचसंगे क्षण शेवटचा जावा, तू ये ना

माझ्या समोर दिसते आहे गर्दी ,पत्रांची...
पण आला नाही तुझाच सांगावा, तू ये ना

आठवते का जिथे चाललो होतो ,त्या दिवशी
त्या वाटेवर जरा विसावा घ्यावा.. ,तू ये ना

धरला होता हात तुझा मी रात्री ,अंधा-या..
हा देहच एक नवा तारा व्हावा , तू ये ना

मनाप्रमाणे माझ्या सगळे तेव्हा, करायचा
म्हणून आता पुन्हा हट्ट धरावा, तू ये ना

कुणाकुणाचा हात टेकला आहे, आभाळा
चंद्र तरी माझ्या मिठीत राहावा.. तू ये ना

गझल: 

प्रतिसाद

छान गझल... आवडली.

पण आला नाही तुझाच सांगावा, तू ये ना

हा देहच एक नवा तारा व्हावा , तू ये ना

म्हणून आता पुन्हा हट्ट धरावा, तू ये ना

या ओळी लयीत वाचता नाही आल्या. :(

या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना
तुझ्याचसंगे क्षण शेवटचा जावा, तू ये ना

मतला फार आवडला...

धरला होता हात तुझा मी रात्री ,अंधा-या..
हा देहच एक नवा तारा व्हावा , तू ये ना

ही कल्पना सुंदर...

शेवटचा आवडला... :-)

या श्वासाचा,कुणी भरोसा द्यावा , तू ये ना
तुझ्याचसंगे क्षण शेवटचा जावा, तू ये ना

वाव्वा. देहाचा नवा तारा होणे ही कल्पनाही आवडली. वाचताना लय तुटते आहे. पण एकंदर कल्पना आवडल्या. छानच.

ही गझल चुकून बघायची राहून गेली होती बहुतेक! मस्त गझल आहे.

धन्यवाद!