पहा दिशाही रुसून बसल्या तुझ्यासारख्या.

सुरुच आहे कितीक गावे तुला शोधणे
जिथे नभाला मिळेल धरती तिथे धावणे

नकोस पाहू उगीच स्वप्ने अशी एकटी
हळूच माझे कधीतरी ऐक ना बोलणे

कुणाकुणाचा विषय निघाला तुला सोडुनी...
अनेकदा संपले तुझ्यावर जरी बोलणे...

जरा फुलांशी, खुळ्या झर्‍याशी, कधी बोललो...
कसे मनाला तुझ्याच बोचे असे वागणे...

पहा दिशाही रुसून बसल्या तुझ्यासारख्या...
जमेल वार्‍यासही अता साकडे घालणे

गझल: 

प्रतिसाद

वा सोनालीजी...
गझल आवडली..
कुणाकुणाचा विषय निघाला तुला सोडुनी...
अनेकदा संपले तुझ्यावर जरी बोलणे... हा फार आवडला.. सहजता अधिक भावली..

गझल आवडली..

मक्ता सह्हीये ...:) आवडली गझल

कुणाकुणाचा विषय निघाला तुला सोडुनी...
अनेकदा संपले तुझ्यावर जरी बोलणे...

गझल आवडली....

छान गझल! मतला अधिक आवडला!

कुणाकुणाचा विषय निघाला तुला सोडुनी...
अनेकदा संपले तुझ्यावर जरी बोलणे...
वाव्वा. फार छान. लहजा फार आवडला. वेगळाच आहे. आणि एकंदर गझलही आवडली. चांगली झाली आहे.

सगळ्याच द्विपदी एकापेक्षा एक ! मस्तच गझल!

गझल आवडली..छान्न्न्न्न्न्न

ए सोनाली, ते, पहा दिशाही रुसुन बसल्या फार आवडल...आधी प्रतिसाद दिलाय पण हा मिसरा लय भारी वाटला आत्ता पुन्हा वाचताना :)

छान... मक्ता आणि ...

कुणाकुणाचा विषय निघाला तुला सोडुनी...
अनेकदा संपले तुझ्यावर जरी बोलणे...

हा फारच आवडला.

सर्वांचे आभार. प्रतिसादाने हुरूप वाढतो, नवे शिकायला मिळते, माझा उत्साह वाढ्वल्याबद्दल तुम्हा सर्वांची ऋणी आहे.
सोनाली

कुणाकुणाचा विषय निघाला तुला सोडुनी...
अनेकदा संपले तुझ्यावर जरी बोलणे...

पहा दिशाही रुसून बसल्या तुझ्यासारख्या...
जमेल वार्‍यासही अता साकडे घालणे

हे दोन शेर खूपच आवडले...

कुणाकुणाचा विषय निघाला तुला सोडुनी...
अनेकदा संपले तुझ्यावर जरी बोलणे.....

वा सोनाली. क्या बात है

हमनें जिस जिस को भी चाहा तेरे हिज्र में वो लोग
आते जाते हुए मौसम थे, ज़माना तू था

हा फ़राज़ साहेबांचा शेर आठवला.

शुभेच्छा

धोंडोपंत

एक सूचना:-

अनेकदा संपले तुझ्यावर तरी बोलणे

या मार्गे जाऊन पहा. जरी मध्ये इतरांना महत्व येताय. जरी तुझ्यावर विषय संपला तरी इतरांचा विषय निघाला..... हा अर्थ होतो. म्हणजे इतरांचे महत्व वाढले.

अनेकांचा विषय जरी निघाला तरी तुझ्यावर येऊन शेवटी ठेपला.... हा विचार जास्त समर्पक वाटतो. इथे 'तिला' महत्व आहे, इतरांना नाही.

विचार करा.

आपला,
(चिंतनशील) धोंडोपंत