आजही अप्रूप वाटे


आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्‍या आरश्यांचे...!


पाप केले मागच्या काही पिढ्यांनी...
भोग प्रायश्चित्त आता वारश्यांचे...


नावही ज्यांचे कुणाला ज्ञात नाही,
कोण कौतुक रोज त्यांच्या बारश्यांचे...!


कोरडा दुष्काळ आहे...समजतो मी...
...सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?


ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?


- प्रा. डॉ. संतोष कुलकर्णी, उदगीर


गझल: 

प्रतिसाद

मस्त गझल. त्यातही

कोरडा दुष्काळ आहे...समजतो मी...
...सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...?
वावा. पावश्यांचे 

ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
वाव्वा...

हे फारच आवडले.

हेच दोन शेर मलाही खूप आवडले.

सूरही गेले कुठे पण पावश्यांचे...? वा..

मतला ही सुरेख.. एक मूड बनविणारा..


ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?  वा..


कोण कौतुक रोज त्यांच्या बारश्यांचे...!.. पण इथे २ किंवा ३ मात्रा जास्त आहेत..वाचताना ओघ तुटल्यासारखा वाटला... 'रोज शब्द काढला तर?

-मानस६


आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्‍या आरश्यांचे...!
खूपच छान....अगदी हातात आरशाचा, तोही मातीत सापडल्याने मळलेला व नंतर साफसूफ केलेला, तुकडा घेऊन मी कुणाचे तरी डोळे दिपवत आहे, असे वाटले !
पाप केले मागच्या काही पिढ्यांनी...
भोग प्रायश्चित्त आता वारश्यांचे...
वा...वा...
ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
छानच...
...................................
- (कवडसा) कवडशांचे,  (आरसा) आरशांचे,  वारसा (वारशांचे ), बारसे (बारशांचे), पावशा -पावश्यांचे, भरवसा  (भरवशांचे).
मूळ शब्दात जेथे असतो, तेथे होतो आणि मूळ शब्दात जेथे असतो, तेथे श्य होतो. अर्थात या
(अ)शुद्धलेखनीय त्रुटीमुळे अर्थाला बाधा पोचत नाही.
...................................

 

आजही अप्रूप वाटे कवडश्यांचे ...!
- अन उन्हाशी खेळणार्‍या आरश्यांचे...!
किति सुंदर! प्रदिप तुम्हि शेर मस्त उलगडुन दाखविलात हो. धन्य्वाद. गझल अत्तिश्य आवडली.

वा डॉक्टरसाहेब,
एकदम सुरेख गझल..सगळेच शेर आवडले..आजून येऊद्या..

आमचा दुसरा एक प्रतिसाद इथे वाचा

केशवसुमार.

कोणते दोन शेर? कळवाल का?
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

ठेवला नाही कुणाचा भरवसा मी
..एरवीही काय होते, भरवश्यांचे...?
---  खरय डॉक्टर्...हेच अंतिम सत्य आहे!!
गझल नेहमी प्रमाणे दर्जेदार!
जयन्ता५२

मतला आणि शेवटचा शेर खूप आवडला!!

सुंदर गझल आहे. शा-श्याची सूट चालुन जाइल.