शहर झाले चांदण्याचे

जसे आकाश खाली शहर झाले चांदण्याचे
जणू साडीस काळ्या पदर झाले चांदण्याचे

कुण्या ख्यालात आली चांदण्याची नीज नंतर
कुण्या स्वप्नात जागे नगर झाले चांदण्याचे

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे

कुठे जावे कळेना पौर्णिमेला पौर्णिमेने
पहारे सख्त अष्टौप्रहर झाले चांदण्याचे

कुणाला सहन नाही होत साधी तिरिपसुद्धा
समर्थन फार हल्ली प्रखर झाले चांदण्याचे

कुणासाठी म्हणे ती अमृताची रात्र होती
कुणासाठी हलाहल जहर झाले चांदण्याचे

मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे

सभोती सूर्यकिरणांचा फवारा मार बाबा
पुरे हे चांदणे बघ गटर झाले चांदण्याचे

गझल: 

प्रतिसाद

मजा आ गया!
'खरखर सिलोनी' अतिशय नाविन्यपूर्ण कल्पना.
मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे... वा वा!

वरी आकाश खाली शहर झाले चांदण्याचे
जणू साडीस काळ्या पदर झाले चांदण्याचे... पिक्चरस्क..
मला नवलाख तळपती दीप विजेचे येथ..
उतरली तारकादळे जणू नगरात.. ह्या ओळी आठवल्यात तात्यासाहेबांच्या

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे... नोसाल्गिक होऊ म्हटले तर तिथेही चांदण्या आहेतच :)
मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे... बहोत खूब!
कुण्या ख्यालात आली चांदण्याची नीज नंतर
कुण्या स्वप्नात जागे नगर झाले चांदण्याचे... वा क्या बात है!

गझल वाचून फ्रेश झालो
-मानस६

कोजागिरीला लिहीली आहे का? :)

मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे....

ब्युटी!!!!!

सगळीच सुंदर!!!!

व्वा.... वारंवारिता कमी असली तरी चित्तजींच्या रचना दीर्घकाळ आनंद देणार्‍या असतात... यास्तव बहुधा आपण पहिल्या गझलेचा अंमल उतरल्यावर्च दुसरी गझल पेश करता.... असो :)

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे

कुठे जावे कळेना पौर्णिमेला पौर्णिमेने
पहारे सख्त अष्टौप्रहर झाले चांदण्याचे

कुणाला सहन नाही होत साधी तिरिपसुद्धा
समर्थन फार हल्ली प्रखर झाले चांदण्याचे

कुणासाठी म्हणे ती अमृताची रात्र होती
कुणासाठी हलाहल जहर झाले चांदण्याचे

सभोती सूर्यकिरणांचा फवारा मार बाबा
पुरे हे चांदणे बघ गटर झाले चांदण्याचे

हे शेर फा....र आवडले. मतल्यातील ''वरी'' हा शब्द खटकला.

@मानस, धन्यवाद. त्या सिलोनी खरखरबद्दल जरा धास्तीच होती. तुम्हाला आवडली. बरे वाटले. ही गझल कोजागिरीला पूर्ण केली :)

@शाम, धन्यवाद.

@कैलासराव, धन्यवाद. वरी खटकतो हे खरे आहे.

कुणाला सहन नाही होत साधी तिरिपसुद्धा
समर्थन फार हल्ली प्रखर झाले चांदण्याचे
!

चित्तरंजन, सर्व गझल आवडली.

व्वा.... वारंवारिता कमी असली तरी चित्तजींच्या रचना दीर्घकाळ आनंद देणार्‍या असतात...
पूर्ण सहमत!!

समर्थन आवडला..
चांदण्यांचे असा रदीफ घेतल्यामुळे, लिहिताना बंधने वाढली ना?

किती छमकन हजारो गजर झाले चांदण्यांचे
हे खुप मस्त!
छमकन हा शब्द किती गोड वाटतोय!

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे


भन्नाट! समर्थनही खासच!
गझल आवडली.

आवडली... नेहमीप्रमाणे अप्रतिम. :)

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे

कुणासाठी म्हणे ती अमृताची रात्र होती
कुणासाठी हलाहल जहर झाले चांदण्याचे

गझल आवडली...

वाहव्वा... सुरेख गझल.

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे

कुठे जावे कळेना पौर्णिमेला पौर्णिमेने
पहारे सख्त अष्टौप्रहर झाले चांदण्याचे

कुणाला सहन नाही होत साधी तिरिपसुद्धा
समर्थन फार हल्ली प्रखर झाले चांदण्याचे

मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे

अप्रतिम शेर आहेत.
धन्यवाद !

ज्ञानेश यांच्याशी सहमत! मला खालील दोन शेर अधिक आवडले.

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे

कुठे जावे कळेना पौर्णिमेला पौर्णिमेने
पहारे सख्त अष्टौप्रहर झाले चांदण्याचे

===============================

खालील शेर नीटसे लक्षात आले नाहीत किंवा जे लक्षात आले त्याने व्यवस्थित समाधान झाले नाही.

कुणाला सहन नाही होत साधी तिरिपसुद्धा
समर्थन फार हल्ली प्रखर झाले चांदण्याचे

मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे

=================================

शब्दरचना लोभस आहे. सिलोनी खरखर नावीन्यपूर्ण!

धन्यवाद!

-'बेफिकीर'!

मलाही चांदण्यावाचून काही स्मरत नाही
तुला मी विसरलो तर विसर झाले चांदण्याचे

शेर खूप आवडला.

वरी आकाश खाली शहर झाले चांदण्याचे
जणू साडीस काळ्या पदर झाले चांदण्याचे

जुन्या तंद्रीतली खरखर सिलोनी ऐकताना
किती छमकन हजारो गजर झाले चांदण्याचे

कुणासाठी म्हणे ती अमृताची रात्र होती
कुणासाठी हलाहल जहर झाले चांदण्याचे

गझल सुरेख ............हे तीन विशेष आवडले ( सिलोनी खरखरीची धास्ती का होती कळेना )

व्वा.... आवडली... नेहमीप्रमाणे अप्रतिम!!

कुणासाठी म्हणे ती अमृताची रात्र होती
कुणासाठी हलाहल जहर झाले चांदण्याचे

गझल आवडली...