छडा लागला रे

वृत्त - भुजंगप्रयात

तुझ्या सोबतीचा नशा लागला रे
असा जीवनाचा लळा लागला रे

मनी आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे

अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे

फिक्या काजळाची झळाळी कितीशी
अभा रक्तिमेचा टिळा लागला रे

तुझ्या बासुरीचा झणत्कार होता
अता भैरवीला गळा लागला रे

पदस्पर्श होता तुझा राघवा रे
शिळेला स्वयंचा छडा लागला रे

सुरेश >>>

गझल: 

प्रतिसाद

मनी आठवांचे पुसूनी उसासे
कुसुंबी फुलांचा मळा लागला रे

अता भावनांची तृषा लोपली रे
सुखाचा झरा हा निळा लागला रे

पदस्पर्श होता तुझा राघवा रे
शिळेला स्वयंचा छडा लागला रे

वाह ! क्या बात ....क्या बात....

खूप आवडले हे शेर!

तुझ्या सोबतीचा नशा लागला रे
असा जीवनाचा लळा लागला रे
वा! वा! छान!

छान.

पहिले दोन शेर वाचून रदिफेतल्या 'रे' ची आवश्यकता नसावी असे वाटून गेले!

(अर्थात, त्यामुळे बदल करावे लागतील, जसे, 'मनी आठवांचे उसासे पुसुन' वगैरे!)

शुभेच्छा!

-'बेफिकीर'!

सर्वांचे धन्यवाद.

छान.

छान गझल. शुभेच्छा.