... स्मरण असावे

विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'

भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'

एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे

पानोपानी जीवन भरले रसरसलेले..
ती कुठली प्रतिभा होती की दळण असावे..?

आज कशाने भावुक झालो..? प्रेम दाटले..?
आज पहा, चंद्राला नक्की ग्रहण असावे

क्षणाक्षणाला बदलत असते 'हो' की 'नाही'
नशीबासही कोणतेतरी बटण असावे

लुकलुकणारे डोळे धापा टाकत होते
आयुष्याच्या अंतीसुद्धा चढण असावे...?

देव नाकारला पण विवेक सुटला नाही
त्यांच्या अंगी निश्चीतच देवपण असावे

सात्विक वृत्ती अधिक जरा आकर्षित बनण्या..
थोडकेच, पण जीवनातही लवण असावे

एवढा कसा मोठा झाला इतक्यामध्ये ?
नक्की तेथे कोणते असे कुरण असावे..?

असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे..
एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे

गझल: 

प्रतिसाद

असे म्हणत नाही मी, की तू उचलुन घ्यावे..
एवढेच म्हणतो की थोडे स्मरण असावे

ह्म्न!!!

खूप आवडला हा शेवटचा शेर!

विजयी झाल्यावर याचेही टिपण असावे
'मोठेपणही माणुसकीला शरण असावे..'

भेद मोडुया आज असा की सर्व म्हणावे...
'जन्म घेतला त्या धर्मातच मरण असावे'

दोन्ही शेर आवडले. मक्ताही मस्त!

सुप्रिया, ह.बा. धन्यवाद!

एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे

अप्रतिम...
सगळीच आवडली.

'विजयी' ऐवजी 'मोठा' ही चालले असते पण द्विअर्थी असल्याने टाळले का?

एवढेच मी सांगू शकतो सरळ मनाने..
जीवनासही कोणतेतरी वळण असावे..छान..........बरका...