'' धर्म ''

'' धर्म ''

संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?

आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही

धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही

धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
सांग तू केले कधीच कुकर्म नाही ?

नागडा मी जाहलो धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?

डॉ.कैलास

गझल: 

प्रतिसाद

अप्रतिम!!!!
संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?

आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही

धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही

धर्म मार्तंडा पहावे झाकुनी तू
सांग तू केले कधीच कुकर्म नाही ?

नागडा मी जाहलो धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?

अस्सल बावनखणी...!!!

धर्मवेडा लोक म्हणती टोचुनी पण
घाव केले ज्या स्थळी ते वर्म नाही

वा वा... बढिया!

गझल पण मस्त. पण हा शेर झकास.


संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?

वा.

आरती अन वंदनाही सारखी मज
गर्व वाटे सांगताना , शर्म नाही

छान. भावना विशेष आवडल्या.

झाडून सगळी गझल फाडू झालीये.... अप्रतीम कैलासजी.

परत परत वाचली,
अत्यंत आवडली.

कैलास जी,
मनःपूर्वक धन्यवाद.... बावनखणी प्रतिसादाबद्दल... :)

धन्य॑वाद बहर..

चित्तजी,
मतला आपणांस भावला.../दुसर्‍या शेरातील भावना आवडल्या याबद्दल धन्यवाद....

हबेंद्रजी,अनिल आपणां दोहोंचे धन्यवाद.... :)

डॉ.कैलास

संपले जीवन कळाला धर्म नाही
हेच तर माझ्या सुखाचे मर्म नाही ?

नागडा मी जाहलो धम्मा समोरी
का तरी ’ कैलास ’ तू बेशर्म नाही ?

वा व्वा....कैलास जी ,मला मतला आणि मक्ता जास्त आवडले.
एकदम सुरेख गझल.

धन्यवाद निलेश...

मला वृत्त लिखाणाबद्दल शिकायचे आहे. कृपया मार्गदर्शन करावे.
मार्क.

सर्वच शेर मस्त.
आवडलेत.

तंत्र आणि आशय या दोन्ही बाजूंनी पहाता एक उत्तम गझल. आम्हां नवशिक्यांसाठी वस्तुपाठ. एक सरस रचना.