जीवना माझ्या बरोबर चालतांना

जीवना माझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली मी हारतांना

कोणत्या वस्तीत मी आलो उगाचच
चेहरा माझा विसरलो,पाहतांना

जाळतो इतिहास माझा रोज हल्ली
रोज का दिसते मला ती हासतांना

सांग ना विश्वास म्हणजे काय असते?
का नदी बघते मुलांना वाहतांना ?

वेदनेशी भेट होती नेहमीची
पाहिले बस हास्य माझे चाळतांना
----------------------------स्नेहदर्शन

गझल: 

प्रतिसाद

मतला कळला नाही.

बाकी गझल चांगली ... शेवटचा शेर विशेष आवडला.

डॉ.कैलास

जीवना माझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली? मी हारतांना

माझा प्रश्न आहे जीवनाला

छान गझल.

जीवना माझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली? तू हारतांना
किंवा
जीवना तुझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली? मी हारतांना

असे हवे हा?

मुटेजी आपण म्हणालात तेच खरं तर अपेक्षित आहे....

जीवना तुझिया बरोबर चालतांना
हार नाही मानली? मी हारतांना

असं काहिसं हवं होतं.. असो.

डॉ.कैलास

जीवना तुझिया बरोबर चालतांना
हार नाही मानली मी हारतांना

असच करतो

जीवना माझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली? तू हारतांना

पेक्षा...

जीवना तुझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली? मी हारतांना

हे अधिक संयुक्तिक वाटते.... ह प्रश्नचिन्ह खूप काम करून जातोय...

असो, पण, या वादात

सांग ना विश्वास म्हणजे काय असते?
का नदी बघते मुलांना वाहतांना

हा एका चांगल्या उंचीचा शेर दुर्लक्षित राहतोय असे वाटते....

सांग ना विश्वास म्हणजे काय असते?
का नदी बघते मुलांना वाहतांना ?

हा शेर आवडला.

मक्ता आवडला नाही. बाकी सगळे शेर निरातिशयसुंदर!

मतल्यात प्रश्नचिन्ह नकोय. अर्थ अजून बदलतोय.

जीवना तुझिया बरोबर चालताना...
हार नाही मानली मी? (हारताना?)

असेही चालेल की!

जीवना माझ्या बरोबर चालतांना
हार नाही मानली? मी हारतांना

माझा प्रश्न आहे जीवनाला

मला वाटतं, दुसर्‍या पोस्टमधे त्यांनी जे सांगायचं ते सांगीतलं आहे.

नदीचा शेर मलाही फार आवडला.
एकूण गझल छान.

मी असेच बोलतो.....

मला जे वाटले ते बोललो मी
तुला जे वाटते बोलून जा तू

सांग ना विश्वास म्हणजे काय असते?
का नदी बघते मुलांना वाहतांना ?
वाव्वा. फार चांगला शेर. गझलही चांगली झाली आहे.

सांग ना विश्वास म्हणजे काय असते?
का नदी बघते मुलांना वाहतांना ?
हा शेर आवड्ला!!