सोसले ना लाड ते कंगाल झाले

संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

का स्वतावर कृष्ण आता खुश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

गाव मी माझा जरी सोडून आलो
वेस ना ओलांडली तू उंबऱ्याची

लावण्या छातीस माता खुश नाही
बालकाला ओढ वाटे पाळण्याची

सोसले ना लाड ते कंगाल झाले
एवढी मिजास होती लेखणीची

गझल: 

प्रतिसाद

व्वा कैलास...... आणखी एक जोमदार गझल.

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

हा शेर बेहद्द आवडला....

संमती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

का स्वतावर कृष्ण आता खूश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

लावण्या छातीस माता खूश नाही
बालकाला ओढ वाटे पाळण्याची

सोसले ना लाड ते कंगाल झाले
एवढी मिज्जास होती लेखणीची

ठळक केलेल्या दुरुस्त्यांकडे कृपया लक्ष द्यावे.

पुलेशु.

डॉ.कैलास

संमत्ती जेव्हा न होती वादळाची
तोडली घरटी कुणी रे पाखरांची

सांत्वनाला कोणीही येणार नव्हते
काढली समजूत त्यांनी आसवांची

चेहरा माझा मला जर ज्ञात आहे
काळजी घेवू कशाला आरशाची

का स्वतावर कृष्ण आता खुश आहे
ओढ राधेला खरेतर बासरीची

अप्रतिमेस्ट!!! कैलासजी मॉर्निंग गुड केलीत. सही गझल!!!