जगण्याला काय हवे..?

जगण्याला काय हवे..?

जगण्याला काय हवे?
आवाहन, नित्य नवे!

बॅंकांना दीर्घ सुट्या,
व्यापारी उर बडवे!

मदतीचा हात कुठे ?
गेले लांबून थवे !

शाखा अन्यत्र नसे,
एकले तरु हिरवे!

छत्री निसटून जाय,
-आणी ती आज सवे!

अमुच्या नशिबात हेच,
"ये, चल घे, गिळ, सटवे!"

-मानस६

गझल: 

प्रतिसाद

छोट्या बहराची सुट्सुटीत गझल ! जरा नवी लयकारीही आहे; पण ती कुठे कुठे निसटते.
'आणी' मधली  वेलांटी दीर्घ असल्यामुळे खटकते. तसेच एक बारीकशी खटकणारी गोष्ट - 'ऊर' हा शब्द माझ्यामते दीर्घ 'ऊ'ने सुरू होतो. तो एकच 'उरबडवे' असा असेल तर 'उ' र्‍ह्स्व चालेल. थोडे तपासून पाहून एक चांगली गझल नितांत निर्दोष करा. निर्विवादही करा.
अभिनंदन!
संतोष

मानस, मतला आणि थवा हे शेर खूप आवडले! बाकी, ऊर्-आणी-अमुच्या इ.बद्दल संतोष कुलकर्णींशी सहमत.
-- पुलस्ति.

धन्यवाद, पुलस्ती, संतोष...
१) १२ मात्रांचे वृत्त आहे. आणि मात्रावृत्तात लिहिली आहे, त्यामुळे कदाचित लय कधी कधी खटकत असेल्...अणि १२ मात्रा कायम ठेवायच्या म्हणून गझल लेखनाच्या प्रचलीत नियमांप्रमाणे णी हा दीर्घ आणि उ ह मुद्दामच र्‍हस्व काढला आहे..आणि अमुच्या मधील अ हा माझ्या माहिती प्रमाणे बरोबर असावा..अनेक कवितांमधुन आमुच्या ह्या ऐवजी अमुच्या असा शब्द प्रयोग आलेला आहे
-मानस६
 

मानसजी,
हा नवा ढंग भावला.झकास!

जगण्याला काय हवे?
मानसचे लिखाण नवे!

जयन्ता५२

 संतोष कुलकर्णींशी पूर्णपणे सहमत आहे.