जगणे असते... (अजब)


जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...


स्वप्ने, कविता, आठवणी अन रोजनिशी
खजिने वाढत जाती आपण भरू तसे...


येता-जाता नकळत गाणे गुणगुणतो
गाणे मनात असते आपण म्हणू तसे...


पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...


नको वसंता, कसली सक्ती  झाडांना;
'अजब' तयांना जसे हवे, दे फुलू तसे...

गझल: 

प्रतिसाद

जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...
वाव्वा!

येता-जाता नकळत गाणे गुणगुणतो
गाणे मनात असते आपण म्हणू तसे...

वाव्वा!

एकंदरच सुंदर. 

अप्रतिम...!
स्वप्ने, कविता, आठवणी अन रोजनिशी
खजिने वाढत जाती आपण भरू तसे...

फारच छान...!

पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...

वा...वा...वा.... 'तसे'...काय ?  भिजा...भिजा...!!!
अजब, हे दोन्ही शेर खूप आवडले...लिहीत राहा...शुभेच्छा
 
 

खजिने आणि गाणे शेर खासच!!
- पुलस्ति.

जगणे असते अपुले आपण जगू तसे
भोवतालचे दिसते आपण बघू तसे...
सुंदरच.

अजब,
मस्त! प्रदीपशी सहमत!

जयन्ता५२

रदीफ चांगला निभावलाय,
पाउस आहे खुणावतो बघ केव्हाचा!
चल ये, आपण पुन्हा एकदा भिजू 'तसे'...
मस्तच आहे...