नसतीच आसवे तर....

सजवील वेदनांचा रस्ता कवी
नसतीच आसवे तर नसता कवी

सांगून काल गेली मजला रती
मदनास मात देतो हसता कवी

शोधू नकोस त्याला शब्दात तू
देवास वाटतो गुलदस्ता कवी

सोडून धीर जग हे बसल्यावरी
मी पाहिलाय कंबर कसता कवी

बोले कुबेर सारे दाऊन धन
नसतोच एवढाही सस्ता कवी

- ह. बा. शिंदे

गझल: 

प्रतिसाद

मतला छानच.....

गझलही छानच.....

शोधू नकोस त्याला शब्दात तू
देवास वाटतो गुलदस्ता कवी

हा शेर वाचल्यावर मला '' तेजाब'' चित्रपटातील अन्नु कपूरचे पात्र आठवले....... अर्थात गझलेच्या आशयाशी अथवा गझलियतशी याचा काही संबंध नाही..... कवी आणी गुलदस्ता एकत्र आले म्हणून आठवलं इतकंच.

डॉ.कैलास

वामनजी,
कैलासजी,
प्रतिसादाबद्दल धन्यवाद!

सोडून धीर जग हे बसल्यावरी
मी पाहिलाय कंबर कसता कवी.....अगदी खरे.खुप छान.

बोले कुबेर सारे दाऊन धन
नसतोच एवढाही सस्ता कवी.....हा ही शेर असाच मस्त.भावार्थ पोचला.

ले.शु.

सोडून धीर जग हे बसल्यावरी..
मी पाहिलाय कंबर कसता कवी..

वाह... अतिषय खरा शेर आहे!! ह.बा.जी.. सगळीच गझल आवडली!

क्या बात है!!

निलेशजी,
बहर (नावामागे जी लावले तर तुझ्या नावातली मजा संपेल)

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!

सोडून धीर जग हे बसल्यावरी
मी पाहिलाय कंबर कसता कवी

अप्रतिम.
गझल आवडली!

छानच.
कवीवर्य.

गंगाधरजी,
अनिलजी,
प्रतिसादाबद्दल आभारी आहे.

धन्यवाद अभिजीतजी.

बहोत खुब मित्र
बोले कुबेर सारे दाऊन धन
नसतोच एवढाही सस्ता कवी
झकास

अवधुत आलास बरे वाटले. तुझी पहिली गझलही छान आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद म्हणणार नाहिच.