का?




मी देह जाळला रे
मी शब्द पाळला रे


फुलली फुले किती,पण
गजरा न माळला रे


केल्या खुणा जगाने
मी मोह टाळला रे


मी नाव कागदी अन्
दर्या उफाळला रे


सजले तुझ्याच साठी
का तू न भाळला रे?


 


(जयन्ता५२)






गझल: 

प्रतिसाद

फुलली फुले किती,पण
गजरा न माळला रे

लाजवाब अप्रतीम 

सुनील

मी नाव कागदी अन्
दर्या उफाळला रे
छान गझल...!

जयंतराव,
फारच सुंदर गझल...
मी देह जाळला रे
मी शब्द पाळला रे

फुलली फुले किती,पण
गजरा न माळला रे

केल्या खुणा जगाने
मी मोह टाळला रे

मी नाव कागदी अन्
दर्या उफाळला रे
... हे चारही शेर फार सुंदर आहेत... आवडले!!
- कुमार

सहमत आहे. ते चारी शेर फार आवडले.

गझल आवडली, दर्याचा शेर सर्वाधिक आवडला

गझल चांगली आहे. छोटा बहर आणि त्यात बरेच काही सांगण्याचा प्रयत्न आवडला. मतला अस्पष्ट झाला आहे, असे वाटले; देह जाळणे आणि शब्द पाळणे यांच्यातला परस्परसंबंध कळला नाही. दर्या आणि खुणांचा शेर जास्त आवडले.
- चक्रपाणि जीवन चिटणीस
    सॅन होजे, कॅलिफोर्निया

वा! जयंत !
अगदी गझलेच्या व्याख्येत बसावी अशी गझल आहे. साधी, सोपी, सरळ आणि मु़ख्य म्हणजे अर्थवाही...
अभिनंदन!
संतोष कुलकर्णी