आवाज आसवांचा

हलकेच ऐकला मी आवाज आसवांचा
हकनाक जीव गेला नाराज आसवांचा

संगीत, रोषणाई दारावरी प्रियेच्या
पाहून पेश केला मी साज आसवांचा

दुष्काळ दाटलेला आनंद आटवोनी
डोळ्यांस पूर आला का आज आसवांचा?

डोळ्यात कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज आसवांचा?"

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

गझल: 

प्रतिसाद

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

व्वा !! छान कल्पना.

डॉ.कैलास

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

सुरेख...हुर्रे! पुढील लेखनास शुभेच्छा.

हलकेच ऐकला मी आवाज आसवांचा

संगीत, रोषणाई दारावरी प्रियेच्या
पाहून पेश केला मी साज आसवांचा

"ही लाज आसवांची, की माज आसवांचा?"

उत्क्रुष्ट गझल!

मस्त रचना!
खालील शेर जास्त आवडले

संगीत, रोषणाई दारावरी प्रियेच्या
पाहून पेश केला मी साज आसवांचा

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

--------------------------------------------नचिकेत भिंगार्डे

कोंडलेल्या थेंबास
अश्रूंना कोंडून डोळ्यास कुलुप लावणे खासच.

मतला अप्रतिम!

सर्वांचे मनापासून धन्यवाद!!!

डोळ्यात कोंडलेल्या थेंबास वाटलेले ,
"ही लाज आसवांची, की माज आसवांचा?"

दु:खात साचलेल्या, विरहात सांडलेल्या
रंगात सजविला मी, 'कोलाज आसवांचा'

वाह क्या बात है दादा.... अप्रतिमच...