हेच असे असते जगणे...

हेच असे असते जगणे
जे घडते नुसते बघणे

हे न कधीच कुणा सुटले
भास उगाचच पांघरणे

ध्यास कुणास बघा असतो...
'ठेच उरातच बाळगणे'

सत्य मनास पटेल कसे ?
फक्त हवे जर थोपटणे

व्यर्थ ठरेल उगीच अता
वीज नभातुन कोसळणे

हाय! मला बघ काम किती...
रोज नवे चमचे भरणे

सोड बिळातच वावरणे
जीवनही जग शूरपणे

वर्तुळ सोड नि ये जगती
बघ, नमतील हजार कणे

सोड अता 'अजया' नुसता
जीव स्वतःतच गुंतवणे

गझल: 

प्रतिसाद

छोट्या बहराची... पण अत्यंत ओघवती..

मतला अन मक्ता विशेष आवडला.

डॉ.कैलास

सत्य मनास पटेल कसे ?
फक्त हवे जर थोपटणे

छान.

हेच असे असते जगणे
जे घडते नुसते बघणे

वर्तुळ सोड नि ये जगती
बघ, नमतील हजार कणे

सुरेख.....लेशु.

धन्यवाद मित्रांनो.

वा! वर्तुळ खास!

लाघवी गझल

रोज नवे चमचे भरणे
'ठेच उरातच बाळगणे'

ग्रेट.