अवेळी अशा..

=================

अवेळी अशा आज कोणाकडे जायचे?
कुठे घेऊनी आपले हे रडे जायचे?

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..

मला लाभली कल्पवृक्षा तुझी सावली..
कसे शक्य आहे अता कोरडे जायचे?

कुणाची तरी गाव चाहूल लावायचे
कुणाच्या तरी अंगणाशी सडे जायचे

तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो
तरी स्तब्ध पाण्यात काही खडे जायचे

चला, आपले सर्व संदेह टाकून द्या
तमातून आता उजेडाकडे जायचे..
.
.
.

-ज्ञानेश.
==================

गझल: 

प्रतिसाद

छान! शब्दरचनेत 'जायचे' ही रदी़फ मागाहून आल्यासारखे दोन, तीन शेरात मला वाटले. जसे:

कुठे घेउनी आपले हे रडे... जायचे व सडे जायचे!

माफ करा, आपल्याशीच मैत्रीने स्पष्ट बोलता येते हे माहीत असल्यामुळे लिहीत आहे.. यावेळेस नेहमीची मजा आली नाही.

क्षमस्व!

अवेळी अशा आज कोणाकडे जायचे?
कुठे घेऊनी आपले हे रडे जायचे?

वाव्वा..

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..

वाव्वा! क्या बात है. फारच आवडला.

तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो
तरी स्तब्ध पाण्यात काही खडे जायचे

वाव्वा.. वरील शेर फार देखणे आहेत. गझल सुरेख झाली आहे.

ज्ञानेश,
मस्त. छान. आवडली रचना.

अवेळी अशा आज कोणाकडे जायचे?
कुठे घेऊनी आपले हे रडे जायचे?

वा.
मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..

- मस्त.
कुणाची तरी गाव चाहूल लावायचे
कुणाच्या तरी अंगणाशी सडे जायचे

छान. वेगळा शेर आवडला.

हा शेर खास आवडला-
तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो
तरी स्तब्ध पाण्यात काही खडे जायचे

चला, आपले सर्व संदेह टाकून द्या
तमातून आता उजेडाकडे जायचे..

वा.
शुभेच्छा. मस्त. आगे बढो...

तळ्याएवढा....
हा शेर आवडला.
चांगली आहे रचना.

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..!
वा! हा शेर सुरेखच आहे. गझल आवडली.

सुरेख गझल! आवडली. तडे आणि खडे सर्वाधिक भावले.

कुणाची तरी गाव चाहूल लावायचे
कुणाच्या तरी अंगणाशी सडे जायचे
मस्त शेर! तुमच्या वयाला साजेसा..:)

तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो
तरी स्तब्ध पाण्यात काही खडे जायचे
सुंदर!! (काय, विचार काय आहे??....:))

गझल आवडली.

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..

हा शेर आवडला.

नेहमीसारखी मजा नाही आली... बेफिकीरशी सहमत..

मनमोकळ्या प्रतिसादाबद्दल सर्व सदस्यांचा आभारी आहे !

चला, आपले सर्व संदेह टाकून द्या
तमातून आता उजेडाकडे जायचे

किती आशादायी शेर आहे हा!

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..

हा तर निरातिशय आवडला.

अवेळी अशा आज कोणाकडे जायचे?
कुठे घेऊनी आपले हे रडे जायचे?

वाव्वा..

मनाची कितीदातरी भिंत मी लिंपली
तरीही कुठे थांबले हे तडे जायचे..

तळ्याएवढा शांत मीही तटी व्हायचो
तरी स्तब्ध पाण्यात काही खडे जायचे

मस्तच गझल्......खुप आवडली

आहा!!
तुमच्या वाचलेल्या एकुण एक गझल आवडल्यात!