काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये

काल ज्या क्षणी तुला मी पाहिले प्रिये
त्या क्षणी हृदय तुला मी वाहिले प्रिये

दु:ख ते कुठे कधी मला न लाभले
गाठण्या तुला बरेच साहिले प्रिये

तू कठोर बोलते तुला विसर पडे
खोल घाव मन्मनात राहिले प्रिये

संकटे तुझ्या विना असंख्य ग्रासती
संकटास आज मीच त्राहिले प्रिये

बोलशी जरी न तू ,सशंक नेत्र का ?
'' कैल-आस'' हा तुझाच ग्वाहिले प्रिये .... ( कैल-आस = कैलास )

-डॉ.कैलास

गझल: 

प्रतिसाद

मतल्यातला मी... मि आहे... र्‍हस्व आहे.

डो.कैलास

अनुभव (माझा बरं का):

दु:ख ते कुठे कधी मला न लाभले
गाठण्या तुला बरेच साहिले प्रिये

गझल बरी वाटली.
- आपला विध्यार्थी.

ह बा..... आपण मला आपला विद्यार्थी म्हटलात नी एक गोष्ट आठवली,

कधी कधी मला गुरुजींच्या धोतराची गाठ खुर्चीशी बांधण्याची हुक्की येते... :)

धन्यवाद

डॉ.कैलास

काळजी करू नका. अजून मी तेवढा हुशार विध्यार्थी झालेलो नाही. झाल्यावर बघु. एक निरोप पाठवला आहे उत्तर कळवा.

झाल्यावर बघु.

हे आपले वाक्य उरात धडकी भरविण्यास पुरेसे आहे. निरोपाचे उत्तर पाठविले आहे.

'हे आपले वाक्य उरात धडकी भरविण्यास पुरेसे आहे.'

गंमत केली. हा... हा... हा... (मी असा हसत नाही पण इथे दुसर्‍या पद्धतीचे हसू टाइपच करता येत नाही.)

निरोप मिळाला नाही.

संकटे तुझ्या विना असंख्य ग्रासती
ही ओळ छान.

गझल फॉर्म्युला वापरून केल्यासारखी वाटली. क्षमस्व! (उदा. कैल-अस = कैलास ) आशय फारसा भिडला नाही. मात्र, आपले विचार (या गझलेबाबत नाही) खूप नावीन्यपूर्ण वाटतात. गाडगेबाबा, सामीष आहार वगैरे!

लो.अ.

हबा व कैलास,

आपले दोघांचे प्रतिसाद गप्पा मारल्यासारखे वाटत आहेत. निरोप पाठवला आहे हेही पुन्हा जाहीर प्रतिसादात लिहीले आहेत. :-))

खासगी चौकशीसाठी व्यक्तिगत निरोपांचा व गप्पांसाठी गप्पाटप्पाचा वापर करावा, ही विनंती

गझल फॉर्म्युला वापरून केल्यासारखी वाटली. क्षमस्व!

क्षमस्व कशाला भूषणराव, आपण करेक्ट ओळखले आहे.....

आज गोकुळात रंग खेळतो हरी....या व्रूत्तात पटकन काहीतरी लिहून दाखव अशी मी अन माझे मित्र श्री.पाटील यांची स्पर्धा लागली..... मी मुद्दाम म्हणून ठरवून कोणत्या वृत्तात लिहित नाही.... पण या वेळी लिहिली आणी आपण बरोबर ताडलेत. असो. !!

जाहीर प्रतिसादात यापुढे व्यक्तिगत निरोप येणार नाहीत.

डॉ.कैलास

दु:ख ते कुठे कधी मला न लाभले
गाठण्या तुला बरेच साहिले प्रिये

तू कठोर बोलते तुला विसर पडे
खोल घाव मन्मनात राहिले प्रिये

ह्या दोन द्वीपदी विशेष आवडल्या.म्हणूनच पुढील द्वीपदी येथे द्यावीसी वाटते.

तिला जे हवे तेच केले जरी मी
मला नाडण्याचे तिला खूळ होते.

तिला जे हवे तेच केले जरी मी
मला नाडण्याचे तिला खूळ होते

अगदी समर्पक निलेश्जी..

डॉ.कैलास