आपला स॑वाद...
भावना॑चा दीप...
भावना॑चा दीप विझल्यासारखा
काळ हा काळीज नसल्यासारखा
आपला स॑ब॑ध थकल्यासारखा
शेवटाचा श्वास उरल्यासारखा
रोज भेटे दुक्ख कोणाचेतरी
रोज र्हिद्यी मी करपल्यासारखा
उगवतो माझा दिवस आता असा
सुर्य आकाशात नसल्यासारखा
शीव ना ओला॑डली त्याने कधी
बोलतो ब्रम्हा॑ड फिरल्यासारखा
सारखा तो चेहरा येतो मनी
सारखा हा प्राण दिपल्यासारखा
वाहतो वारा तुझ्या कबरीपुढे
हात पाठीवर फिरवल्यासारखा
पाहिले मझ्याकडे तू एकदा
भास झाला प॑ख फुटल्यासारखा
वेदना होतात का गगना तुला
र॑ग दिसतो साप डसल्यासारखा
कोम्ब आताशाच हा फुटला मला
मी अजुन मातीत असल्यासारखा...
-वैभव देशमुख
गझल:
प्रतिसाद
ज्ञानेश.
मंगळ, 12/01/2010 - 11:20
Permalink
पाहिले माझ्याकडे तू एकदा भास
पाहिले माझ्याकडे तू एकदा
भास झाला प॑ख फुटल्यासारखा..
मस्त शेर.
एकूण गझल आवडली!
केदार पाटणकर
बुध, 13/01/2010 - 11:10
Permalink
वैभव, सर्व शेर आवडले. खूप
वैभव,
सर्व शेर आवडले. खूप छान.
वैभव देशमुख
गुरु, 14/01/2010 - 16:28
Permalink
भावना॑चा दीप... भावना॑चा दीप
भावना॑चा दीप...
भावना॑चा दीप विझल्यासारखा
काळ हा काळीज नसल्यासारखा
आपला स॑ब॑ध थकल्यासारखा
शेवटाचा श्वास उरल्यासारखा
रोज भेटे दुक्ख कोणाचेतरी
रोज र्हिद्यी मी करपल्यासारखा
उगवतो माझा दिवस आता असा
सुर्य आकाशात नसल्यासारखा
शीव ना ओला॑डली त्याने कधी
बोलतो ब्रम्हा॑ड फिरल्यासारखा
सारखा तो चेहरा येतो मनी
सारखा हा प्राण दिपल्यासारखा
वाहतो वारा तुझ्या कबरीपुढे
हात पाठीवर फिरवल्यासारखा
पाहिले मझ्याकडे तू एकदा
भास झाला प॑ख फुटल्यासारखा
वेदना होतात का गगना तुला
र॑ग दिसतो साप डसल्यासारखा
कोम्ब आताशाच हा फुटला मला
मी अजुन मातीत असल्यासारखा...
-वैभव देशमुख
बेफिकीर
गुरु, 14/01/2010 - 23:23
Permalink
ही नवीनच गझल जास्त आवडली.
ही नवीनच गझल जास्त आवडली. बहुतेक सर्वच शेर छान व 'कबरीचा' फारच सुंदर!(कबर का?) 'शीव' शेरावरून सध्या रजेवर असलेल्या प्रदीपसाहेबांच्या काही शेरांची आठवण झाली. त्यांच्या गझलेसाठी किती थांबावे लागणार कोण जाणे!
अभिनंदन वैभव!
चित्तरंजन भट
शुक्र, 15/01/2010 - 01:39
Permalink
वा! वैभव, उत्तम गझल आहे.
वा! वैभव, उत्तम गझल आहे. सगळेच शेर आवडले. अभिनंदन.
अनंत ढवळे
शुक्र, 15/01/2010 - 11:09
Permalink
उगवतो माझा दिवस आता असा सुर्य
उगवतो माझा दिवस आता असा
सुर्य आकाशात नसल्यासारखा
को॑भ आताशाच हा फुटला मला
मी अजुन मातीत असल्यासारखा...
सुंदर !!
उदय नावलेकर
शुक्र, 15/01/2010 - 16:44
Permalink
सुरेख गझल. कुठलाच शेर वगळता
सुरेख गझल. कुठलाच शेर वगळता येणार नाही. अतीशय आवडली.
विश्वस्त
सोम, 18/01/2010 - 21:55
Permalink
मूळ गझलेत प्रतिसादाप्रमाणे
मूळ गझलेत प्रतिसादाप्रमाणे बदल केले आहेत.
अर्चना लाळे
मंगळ, 19/01/2010 - 11:09
Permalink
ब्रम्हांड आवडले.
ब्रम्हांड आवडले.
अजय अनंत जोशी
बुध, 20/01/2010 - 17:47
Permalink
आपला स॑ब॑ध
आपला स॑ब॑ध थकल्यासारखा
शेवटाचा श्वास उरल्यासारखा
वा! वा!!
चांगली गझल.
वैभव देशमुख
बुध, 20/01/2010 - 20:32
Permalink
प्रतिसादाबद्दल सर्वा॑चे
प्रतिसादाबद्दल सर्वा॑चे धन्यवाद......
बेफिकीर
गुरु, 21/01/2010 - 15:18
Permalink
९२७०३३०१४४ ही व्यक्ती आपली
९२७०३३०१४४
ही व्यक्ती आपली फार आठवण काढते.
आठवा -औरंगाबाद - 'पंख आम्हाला कवितेचे'
(अर्थात, मी व तुम्ही एकमेकांना ओळखतही नाही. पण तुमचा विषय जरूर झाला)
ह बा
शुक्र, 21/05/2010 - 17:15
Permalink
पाहिले मझ्याकडे तू एकदा भास
पाहिले मझ्याकडे तू एकदा
भास झाला प॑ख फुटल्यासारखा
वा! वा!!सुरेख गझल!
ते असो...
वैभवजी आपणास न अॅकवता काही गझला (?) प्रकाशीत केल्या आहेत. कधी कधी आपण कवीतेतच राहिलेले बरे असे वाटते पण काही भल्या माणसांनी चांगल्या प्रतिक्रिया देउन मी गझल लीहू शकेन अशी अंधुक आशा दावली आहे. वाचून घे आणि सुधारणा कळवा.
मिल्या
रवि, 23/05/2010 - 23:40
Permalink
सुरेख गझल पाहिले मझ्याकडे तू
सुरेख गझल
पाहिले मझ्याकडे तू एकदा
भास झाला प॑ख फुटल्यासारखा
कोम्ब आताशाच हा फुटला मला
मी अजुन मातीत असल्यासारखा >>> मस्त शेर