धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी
टाळलेला आजही निष्णात कोणी
धुमसतो अद्याप माझ्या आत कोणी
माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी
केवढा आहे महत्वाचा पहा मी..
सांडलेले रक्तही भरतात कोणी
का मला टाळून गेली ती दुकाने ?
[ वेदना भरतात का.. गल्ल्यात कोणी? ]
आपली ओळख असावी फार मोठी
एवढ्यानेही कवी होतात कोणी
मद्यपींना एक माझे सांगणे की,
भाकरी मिळण्यासही फिरतात कोणी
दैव होते चांगले की जन्मलो मी
अन्यथा मरते कधी गर्भात कोणी
- अजय अनंत जोशी
पुणे
गझल:
प्रतिसाद
कैलास
सोम, 26/04/2010 - 20:18
Permalink
दैव होते चांगले की जन्मलो
दैव होते चांगले की जन्मलो मी
अन्यथा मरते कधी गर्भात कोणी
व्वा.... उत्तम आशय असलेला शेर.
डॉ.कैलास
Avinash Ghongate
सोम, 26/04/2010 - 21:59
Permalink
खरच बेस्त आहे. माहिती होती
खरच बेस्त आहे.
माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी
........................................स्वतः फसल्यावर असीच प्रतिक्रिया होनार ...........!!!!!!!
...........................................आपला अह जाग्रुत झाल्यावर कुनाचे काय चालते............??
Avinash Ghongate
सोम, 26/04/2010 - 22:02
Permalink
माफ करा पन दुसरा मिसरा कन्सात
माफ करा पन दुसरा मिसरा कन्सात का बरे ताकला?????/
केदार पाटणकर
गुरु, 29/04/2010 - 14:19
Permalink
जोरात चा शेर व शेवटचा शेर खूप
जोरात चा शेर व शेवटचा शेर खूप दमदार झाले आहेत.
छान.
गंगाधर मुटे
शुक्र, 30/04/2010 - 22:48
Permalink
मतला,मक्ता आणि जोरात खुप
मतला,मक्ता आणि जोरात खुप आवडले.
अजय अनंत जोशी
शनि, 08/05/2010 - 12:36
Permalink
धन्यवाद सर्वांना...!
धन्यवाद सर्वांना...!
मिल्या
गुरु, 27/05/2010 - 19:41
Permalink
सर्वच शेर आवडले... धुमसतो
सर्वच शेर आवडले...
धुमसतो मिसरा तर फार आवडला
अजय अनंत जोशी
गुरु, 27/05/2010 - 21:07
Permalink
अविनाश, प्रश्नोत्तरी असल्याने
अविनाश,
प्रश्नोत्तरी असल्याने उत्तर कंसात टाकले आहे.
प्रतिसादांबद्दल धन्यवाद.
मिल्या,
रविवारच्या कार्यक्रमात तुमची उपस्थिती आनंद देऊन गेली.
चित्तरंजन भट
शुक्र, 28/05/2010 - 08:49
Permalink
माहिती होती जगाला गोष्ट
माहिती होती जगाला गोष्ट सारी
बोलले नाही तरी जोरात कोणी
छान.
अजय अनंत जोशी
शनि, 29/05/2010 - 10:26
Permalink
धन्यवाद चित्तरंजन. हा शेर
धन्यवाद चित्तरंजन.
हा शेर बर्याच जणांना आवडला.
निलेश कालुवाला
शनि, 29/05/2010 - 19:28
Permalink
मद्यपींना एक माझे सांगणे
मद्यपींना एक माझे सांगणे की,
भाकरी मिळण्यासही फिरतात कोणी
अजयजी मद्यपींना खरेच तुमचे सांगणे पटो.नाहीतर त्यांचा शेवट नेहमी असाच व्हायचा.......
तो नशेतच असा संपला
ग्लास अन बाटली राहिली
एकूण गझल आवडली.
अजय अनंत जोशी
शुक्र, 04/06/2010 - 23:13
Permalink
धन्यवाद निलेश! तुमची
धन्यवाद निलेश!
तुमची द्विपदीही छान.