तुलाही, मलाही...

=================


जुळा  ध्यास  आहे  तुलाही, मलाही
तरी  त्रास  आहे  तुलाही, मलाही..


कसे  ओळखावे  तुला मी, मला  तू..
व्यथा  खास  आहे, तुलाही, मलाही


अताशा  मिठीही  अशी  वाटते  की,
गळा  फास  आहे  तुलाही, मलाही..


जुन्या  लालसेचा  विझेना  निखारा,
नवी  आस  आहे  तुलाही, मलाही..


तशी  एक  आहे  व्यथा  सारखीशी,
म्हणायास  आहे, तुला- ही, मला- ही


कशाला  कुणी  दोष  द्यावा  कुणाला
'इतीहास' आहे, तुलाही..मलाही...!!


==================

गझल: 

प्रतिसाद

जुळा  ध्यास  आहे  तुलाही, मलाही
तरी  त्रास  आहे  तुलाही, मलाही.. (दोन ओळींचा संबंध काय ? )

कसे  ओळखावे  तुला मी, मला  तू..
व्यथा  खास  आहे, तुलाही, मलाही ( संबंध काय दोन ओळींचा? )

अताशा  मिठीही  अशी  वाटते  की,
गळा  फास  आहे  तुलाही, मलाही.. ( चांगला शेर )

जुन्या  लालसेचा  विझेना  निखारा,
नवी  आस  आहे  तुलाही, मलाही.. ( म्हणजे काय ? )

तशी  एक  आहे  व्यथा  सारखीशी,
म्हणायास  आहे, तुला- ही, मला- ही ( म्हणजे काय ? )

कशाला  कुणी  दोष  द्यावा  कुणाला
'इतीहास' आहे, तुलाही..मलाही...!! ( म्हणजे काय ? )

एकंदर काही  प्रतिसादांवरून असे जाणवते, की मी गझल करण्यास लायक मनुष्य नाही. त्यामुळे यापुढे या साईटवरून माझ्या गझल प्रकाशित होणार नाहीत, अशी खबरदारी घेईन.
आतापर्यंत प्रतिसाद दिलेल्या सर्वांचे मनःपुर्वक आभार.
 

हे बरोबर नाही. मराठी गझलेची हानि होईल. तिलकधारींनी फक्त शंका विचारल्या आहेत. त्यांचे निरसन केले जाऊ शकते. त्यांनी आपल्या 'त्यांना चांगल्या वाटलेल्या' गझलांची वारेमाप स्तुतीपण केली आहे. त्यांच्याकडे दुर्लक्षपण केले जाऊ शकते. कुठेही जाऊ नका. या साईटवर आपल्यासारखे शायर आवश्यक आहेत.  पुढची गझल येऊदेत.
या गझलेबाबत बोलायचे तर मी असे म्हणेन की आपल्या इतर गझलांच्या तुलनेत थोडी डावी असली तरी चांगली जमलेली गझल आहे. प्रामुख्याने लालसा, व्यथा व गळाफास हे शेर सॉलीड आहेत.
लिहीत रहा.
शुभेच्छा!

ज्ञानेश,
कशाला चिंता करता? न समजणा-यांकडे लक्ष देऊ नका.
जुळा  ध्यास  आहे  तुलाही, मलाही
तरी  त्रास  आहे  तुलाही, मलाही..              जुळा ध्यास - चांगली संकल्पना
कसे  ओळखावे  तुला मी, मला  तू..
व्यथा  खास  आहे, तुलाही, मलाही               खास मुळे वजन
अताशा  मिठीही  अशी  वाटते  की,
गळा  फास  आहे  तुलाही, मलाही..              गळा ऐवजी गळी हवे होते काय?
जुन्या  लालसेचा  विझेना  निखारा,
नवी  आस  आहे  तुलाही, मलाही..               जुन्या लालसेची नवी आस - मस्त
तशी  एक  आहे  व्यथा  सारखीशी,
म्हणायास  आहे, तुला- ही, मला- ही               छान.
कशाला  कुणी  दोष  द्यावा  कुणाला
'इतीहास' आहे, तुलाही..मलाही...!!                इतीहास?... असो.चालेल
शेवटचा शेर टीका करणा-यांनी पुन्हा पुन्हा वाचावा.
मला तरी आवडले.
कलोअ चूभूद्याघ्या

मला तरी शेरांचे अर्थ समजलेत. माझ्या तोकड्या बुद्धिला झेपतील तसे.
आवडलीसुद्धा.
जुळा  ध्यास  आहे  तुलाही, मलाही
तरी  त्रास  आहे  तुलाही, मलाही..
अताशा  मिठीही  अशी  वाटते  की,
गळा  फास  आहे  तुलाही, मलाही..
कशाला  कुणी  दोष  द्यावा  कुणाला
'इतीहास' आहे, तुलाही..मलाही...!!