साधवी...

साधवी... ( गझल )

शब्द माझे मानसी होणार केव्हा?
काव्य माझे कौमुदी घडणार केव्हा?

का असा लांबून माझा ध्यास घेते?
बाहुपाशी तू सखे जडणार केव्हा?

का जगाला टाळतो नाना प्रकारे?
मी स्वयंभू पूर्णतः बनणार केव्हा?

मी तुझ्यासाठीच माझे शब्द वेचू;
तू अशी जादूगरी करणार केव्हा?

मोह-मायेच्यामधे, पुरता बुडालो;
सांग देवा, मी पुन्हा तरणार केव्हा?

धगधगे वैफल्य ज्वाला, या उराशी,
मोक्ष मज आता तरी, मिळणार केव्हा?

मी गझलची, साधना, करतो अताशा;
साधवी माझी गझल, ठरणार केव्हा?

- निरज कुलकर्णी.

वृत्त - मंजुघोषा
गण - गालगागा गालगागा गालगागा
मात्रा - २१

गझल: 

प्रतिसाद

मोह-मायेच्यामधे, पुरता बुडालो;
सांग देवा, मी पुन्हा तरणार केव्हा?

मी गझलची, साधना, करतो अताशा;
करीतच रहा. ते फायद्याचे आहे.

मला एक गोष्ट माहीत नाहीये, ज्यावर तज्ञांनी भाष्य करावे अशी विनंती!
मी असे ऐकले होते की साध्या, बोली भाषेत गझल लिहावी. सदर गझलेतील भाषा तशी वाटत नाही.
मात्र हे खरे, की मला गझल मनापासून आवडली.

बोली भाषेत गझल लिहावी की न लिहावी हे गझलकारावर सोडून द्यावे. अमकीच खरी - अमकी नको हे अधिकारवाणीने कोण सांगू शकेल? [सध्यातरी कोणी दिसत नाही.] तंत्र आणि विषय भरकटत नाही ना, हे पहा. वरील गझलेसारख्या अनेक गझला आहेत. शेवटी कोणताही कवी हा एक विद्यार्थीच असतो. काव्यात कितीही शिकले तरी कमीच आहे. गझलही याला अपवाद नसावा .. नाहीच. निरज यांच्या या ओळी पहा...
मी गझलची, साधना, करतो अताशा;
साधवी माझी गझल, ठरणार केव्हा?

खरेतर, साध्वीलाही साधना सुटत नाही.
निरज यांना माझ्या शुभेच्छा.

काव्य माझे कौमुदी घडणार केव्हा???

कौमुदी म्हणजे चंद्रप्रकाश...
आपल्याला म्हणायचे काय नक्की?