कसेबसे
कसेबसे घाईत स्वतःचे काम उरकतो
जो तो येथे जमेल तितके दिवस ढकलतो
पुढे जायला हवे,थांबणे शक्यही नसे
पायामध्ये ताकद नाही तो सरपटतो
जिंकलो जरी वेदने तुझे राज्य अखेरी
जीव जाईना म्हणून मी मग का तळमळतो?
रामनाम घेतलेस ना तू शेवटास?,तो
क्षुल्लक तेव्हा जगण्याचे कोडे उलगडतो
मलाच का हा निश्चय म्हणजे डोंगर भासे?
दोन पावले चढून गेलो तोच घसरतो
रंग बदलतो डोक्यावर घेऊन अचानक
सध्या मजला डोक्यावरचा भार समजतो
गझल: