चक्रव्यूह

गर्भामधील दीक्षा, ना तू मनावरी घे
हा चक्रव्यूह आहे, अभिमन्यु काळजी घे

येथे हळूच कोणी, जादा हुशार होते
आले तसे कुणी की, माघार आपली घे

मातेस काय त्याचे, चर्चा करी फुकाची
मामास काय त्याचे, हातात बासरी घे

रम्या कथा लढाई, कोणी नसे कुणाचा
होतील वार मित्रा, लवताच पापणी घे

सोपे असेल येणे, हे तोडणे न सोपे
बेटा न तू पित्याचा धोका तुझ्यावरी घे     

गझल: 

प्रतिसाद

येथे हळूच कोणी, जादा हुशार होते
आले तसे कुणी की, माघार आपली घे

जमीन चांगलीच आहे...

 धनुर्विद्येवर गझल केली? चांगला तीक्ष्ण झालाय बाण! पण काव्यमूल्य बोथट!

व्यूहात्मक रचना.