माझा मलाच आता...

माझा मलाच आता अंदाज येत नाही
आतून कोणताही आवाज येत नाही


डोळ्यात सागराच्या उठती अनंत लाटा
पण मूक, मूक सारे .... ती गाज येत नाही


आहेत तसाच ठेवा चित्रातही मला ह्या
माझ्याच चेहर्‍याची मज लाज येत नाही


जो सूर पाहिला मी तेव्हा मिटून डोळे
माझ्या गळ्यातुनी तो स्वरसाज येत नाही


बेभान जिंदगीची चढली अशी नशा की -
मृत्यूसही म्हणालो -"जा, आज येत नाही"


                                 -   सदानंद डबीर

गझल: 

प्रतिसाद

पहिल्या शेरामधले म्हणणे मान्य आहे! इतर शेर बरे!
खेचेल लक्ष ऐसा अल्फाज येत नाही
आम्हास कोण जाणे का नाज येत नाही

बांधावया तुम्हाला का ताज येत नाही?
की जीवनात कोणी मुमताज येत नाही?
ठेवा शमा समोरी, गुम्फा हजार गझला
ईर्शाद बोलणारा, नाराज, येत नाही

 

आहेत तसाच ठेवा चित्रातही मला ह्या
माझ्याच चेहर्‍याची मज लाज येत नाही....


बेभान जिंदगीची चढली अशी नशा की -
मृत्यूसही म्हणालो -"जा, आज येत नाही".. हे शेर फार भावलेत, डबीर साहेब
-मानस६


बेभान जिंदगीची चढली अशी नशा की -
मृत्यूसही म्हणालो -"जा, आज येत नाही"
मस्त.

नमस्कार काका,
तुझी ही गझल वाचली, पण या पेक्षा किती तरी भारी गझल तू लिहीतोस. हे सांगणे न लगे!
हि गझल पण आवडली!
हिमांशु डबीर