गुन्हे


प्रश्न एकावरी एक साचून राहिल्यासारखे
मीच माझे गुन्हे नीट मांडून ठेवल्यासारखे

         घाव सोसू कसे,लाज झाकून राहता राहिना
          थेट माझ्यावरी नेम आडून रोखल्यासारखे

एकटा राहिलो,आज सोडून चालले सोहळे
एवढे कर्जही श्वास मोजून फेडल्यासारखे

           मी न नात्यातला,जोर काढून फेकले हक्कही
           मोकळे वाटले शाप भोगून संपल्यासारखे

शांत देहात या खोल गाडून टाकले प्रश्न मी
मीच माझ्यातले बंड मोडून काढल्यासारखे

            काल गावात या लोक आतून वागले एवढे
            आज गावात या लोक राखून वागल्यासारखे

 

गझल: