कवी नावाची शिवी

साध्याच माणसाची साधीसुधी कहाणी
गझलेत सावकारी, दुर्मीळ चायपाणी


या टेकड्या, कडे हे, अंधार आणि खड्डे
फिरतो मनात माझ्या होऊन मी लमाणी


होण्यास संत,  साधे,  प्रेमामधे पडावे
ती बेवफा निघावी, येईल संतवाणी


मदिरा खराब आहे, आम्हास सांगती जे
आली नि संपलीही त्यांची किती घराणी


गझलेत मावणारा ना शब्द लाभला की
सोपा उपाय आहे कर 'आणि' ला तू 'आणी'


नमकीन स्वाद होता ओठामधे प्रियेच्या
आश्चर्य काय, खारे, डोळ्यामधील पाणी


ही वेदना मनाची का गप्प गप्प आहे?
आली वयात, बहुधा झालीय ती शहाणी


संबंध तोडताना खाली तिने बघावे
भासे अदा, म्हणालो, लाजू नकोस राणी


वाटो शिवी 'कवी' ही, आम्हास चालते ती
आम्ही तिचे दिवाणे, ती आमची दिवाणी


 


 


 


 




 

गझल: 

प्रतिसाद

या टेकड्या, कडे हे, अंधार आणि खड्डे
फिरतो मनात माझ्या होऊन मी लमाणी

ही वेदना मनाची का गप्प गप्प आहे?
आली वयात, बहुधा झालीय ती शहाणी

मात्र उरलेल्या शेरांमधे काही आहे का याचा जरूर विचार करावा.
क्रुपया राग मानू नये.

होण्यास संत,  साधे,  प्रेमामधे पडावे
ती बेवफा निघावी, येईल संतवाणी



मदिरा खराब आहे, आम्हास सांगती जे
आली नि संपलीही त्यांची किती घराणी

हे दोन शेर तर क्लास!

या टेकड्या, कडे हे, अंधार आणि खड्डे
फिरतो मनात माझ्या होऊन मी लमाणी
संबंध तोडताना खाली तिने बघावे
भासे अदा, म्हणालो, लाजू नकोस राणी
छान.

बाणांना धार लाव.

प्रिय भूषण,
असे काही जमते का ते पहा...
बाणास धार लावुन उपयोग फार नाही..
साधाच बाण पाहुन मागाल तेथ पाणी