जिंदगी

जशी जिंदगी ढळू लागली
*तशी तशी ती कळू लागली


कुपोषणाची कीड पसरता
नवी पालवी गळू लागली


शांति-ज्योत ही पेटविल्यावर
शांतता होरपळू लागली


दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली


कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली


जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली


गंध तिचा वाऱ्यावर फिरला
कळी कळी दरवळू लागली


अशी जन्मभर तेवलीस की
ज्योत उराशी जळू लागली


पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली


*ह्या संकेतस्थळावरील एका सद्स्याच्या सुचनेनुसार मतल्यात बदल केला आहे.

गझल: 

प्रतिसाद

कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली
पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली
हे दोन विशेष आवडले.

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
 
हे तीन शेर फार फार आवडले...शुभेच्छा.
लोंबकळू ...वाचताना धडपडलो़, पण कल्पना अभिनव आहे...सुंदर.

मिल्या,
प्रत्येक शेर एक बाण आहे. 4,5,6,7 & 9 वे बाण जीवघेणे!

लोंबकळू आणि भळभळू हे शेर मला विशेष आवडले!!

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागलीकशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली

हे तीन शेर फार फार आवडले...शुभेच्छा.
लोंबकळू ...वाचताना धडपडलो़, पण कल्पना अभिनव आहे...सुंदर.
पूर्णपणे सहमत आहे

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली
कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली
जरी आंधळा तरी जगाची
नेत्रपल्लवी कळू लागली
 तीन शेर विशेष आवडले...शुभेच्छा.
लोंबकळू  जरा खटकले, पण कल्पना अभिनव आहे...सुंदर.
अनिरुद्ध

प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचेच आभार...
 

दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली

हा जबरदस्त शेर आहे. समकालीन जाणिवांचा एक उत्तम नमुना. असे शेर कमीच दिसतात.

मला थेट दुष्यंत कुमारची आठवण झाली.

रेल की तरह गुजरती हो तुम
पूल की तरह थरथराता हूं मै

मिल्या,
पुढचा भाता काढ! बाण येत राहुदेत. थांबायचे नाही.

व्वा..छान...
दुनियेची बस तुडुंब भरली
जिंदगी लोंबकळू लागली
कशास फुंकर तिने घातली?
जखम पुन्हा भळभळू लागली

*तशी तशी ती कळू लागली
चांगलाच बदल आहे!

पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली

 आणि फुंकर आवडली

पाय रोवुनी उभी रोपटी
वादळेच उन्मळू लागली

खूप आवडला...