मराठी साहित्य क्षेत्र?

चेहरे झाकून, खोटे नांव घेती
देउनी सल्ले फुकाचे, भाव घेती


कापती वाटेल ते वाटेल त्याचे
आपली राखायला ते वाव घेती


वाकडे बोलू नका जे की खरे ही
माणसांचे, माणसे ती चाव घेती


की तुम्ही काही लिहा वायाच जाते
आपल्यांना दाद देण्या धाव घेती


वाळक्या शब्दांस येथे मानचिन्हे
शब्द मेले, जे मनाचे ठाव घेती


जे कुणी रोवायला पायास जाती
लोळती मातीत आणी घाव घेती ( चालते असे ऐकलंय)


व्हा जरासे नम्र, आशीर्वाद मागा
केवढे उस्तादवाले आव घेती 


 


  


 


 

गझल: 

प्रतिसाद

चेहरे झाकून, खोटे नांव घेती
देउनी सल्ले फुकाचे, भाव घेती

की तुम्ही काही लिहा वायाच जाते
आपल्यांना दाद देण्या धाव घेती

व्हा जरासे नम्र, आशीर्वाद मागा
केवढे उस्तादवाले आव घेती

गझल आवडली. त्याचबरोबर ? ही आवडले. खरे तर या गोष्टी अनेक क्षेत्रांत लागू होतील. म्हणून ? आवडले.