जमले नाही....

शेवटचीही भेट घ्यायला जमले नाही.
तुझ्या घरी मज पुन्हा यायला जमले नाही.

कसे ओळखू सांग तुझे बोलके इशारे..?
इथे स्वतःला ओळखायला जमले नाही.

मला दिल्या तू उदास संध्या... भयाण रात्री...
तुझे दान हे परतवायला जमले नाही.

कधीच नाही बोललीस तू व्यथा मनातिल..
मलाही तुला समजवायला जमले नाही.

हजार आले मला बुलावे तारूण्याचे...
प्रत्येकाला ठोकरायला जमले नाही.


रूपेश देशमुख.
संवेदना रायटर्स कम्बाईन, अकोला-४४४००१.
मो.क्र.: ९९२३० ७५७४३.

गझल: 

प्रतिसाद

मतला आणि त्यापुढील दोन शेर फार आवडले...शुभेच्छा.

मला दिल्या तू उदास संध्या... भयाण रात्री...
तुझे दान हे परतवायला जमले नाही.
सुंदर !!

मला दिल्या तू उदास संध्या... भयाण रात्री...
तुझे दान हे परतवायला जमले नाही.

हजार आले मला बुलावे तारूण्याचे...
प्रत्येकाला ठोकरायला जमले नाही.

हे विशेष आवडले

शुभेच्छा पुढील लेखनास...

व्वा...छान.....
कधीच नाही बोललीस तू व्यथा मनातिल..
मलाही तुला समजवायला जमले नाही.

हजार आले मला बुलावे तारूण्याचे...
प्रत्येकाला ठोकरायला जमले नाही.

मतला सहज, साधा, सुंदर उतरला आहे
कसे ओळखू सांग तुझे बोलके इशारे..?
इथे स्वतःला ओळखायला जमले नाही.  हा ही शेर उत्तम आहे
-मानस६

शेवटचीही भेट घ्यायला जमले नाही.
तुझ्या घरी मज पुन्हा यायला जमले नाही.

आणि मक्ता, मस्त आहेत हे शेर!