पाहिजे.....

गझलेमधे जरासे नावीन्य पाहिजे.
नावीन्य आणण्याचे प्रावीण्य पाहिजे.

चर्चा तिचीच व्हावी दाही दिशांमधे;
गझलेत प्रेयसीचे लावण्य पाहिजे.

येईल मोल साध्या टीकेसही तुझ्या;
आधी तुझ्यात तितके नैपुण्य पाहिजे.

वार्ध्यक्य लेखणीला येवू नये कधी;
चिरकाल बहरणारे तारूण्य पाहिजे.

खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.

अमित वाघ.
"गुरूमंदिर", सुधीर कॉलनी,
अकोला: ४४४००१. मो.क्र.: ९७६६६ ९७६६७; ९८५०२ ३९८८२.
संवेदना रायटर्स कम्बाईन,अकोला-४४४००१.


[ ही रचना अलामतीचे नियम पाळत नसल्यामुळे विचाराधीन करण्यात आली आहे --विश्वस्त]

गझल: 

प्रतिसाद

खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.
 सुंदर !!

खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.
या ओळी छान.

येईल मोल साध्या टीकेसही तुझ्या;
आधी तुझ्यात तितके नैपुण्य पाहिजे.

हा शेर कोणाला लागू होतो सांगायला नको...

खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.जबर्दस्त शेर आहे हा...

श्री यादगार,
माझ्या माहितीसाठी या गझलेतील काफिया कुठला व अलामत कुठली ते सांगीतलेत तर मदत होइल. माझा गोंधळ खालील शब्दांमुळे होत आहे:
नावीन्य, प्रावीण्य, नैपुण्य, लावाण्य, कारुण्य, तारुण्य.
धन्यवाद!

पुन्हा दाद दिल्यावाचून राहवले नाही...
खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.
मस्त!!
भूषण,
ह्या गझलेच्या अलामती विषयी चर्चा खालील दुव्यावर झाली होती..
http://www.marathigazal.com/node/454

खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
ही एक ओळ सुरेख आहे. शुभेच्छा.

धन्यवाद...
श्री. अनंत ढवळे साहेब आणि श्री अजय अनन्त जोशी साहेब....

जे प्रस्थापित गझलकार म्हणून बसले आहे ते तर तुला वाटणार्‍या आणि दिसलेल्या इथल्या बोचर्‍या प्रतिक्रियांहून खतरनाक आहेत.
स्व. भटांचा एक जबरदस्त शेर आहे. त्यातून थोडासा बोध घे हो बाळाssss

येथे पिसून माझे काळीज बैसलो मी
आता भल्या-भल्यांच्या हातात डाव नाही

आणि इथेच कोणाचा तरी वाचलेला एक शेर

सांगण्या साठी अबोला...
- पत्र कोरे पाठवावे

-तुझे बिनधास्त अजोबा

चर्चा तिचीच व्हावी दाही दिशांमधे;
गझलेत प्रेयसीचे लावण्य पाहिजे.

आणि
खांद्यावरी तुझ्याही बसतील पाखरे;
नजरेत फक्त थोडे कारूण्य पाहिजे.
 
खरं म्हणजे सर्वच शेर आवडले. पण ज्या शेरांभोवती रेंगाळावे वाटले त्या शेरांचे स्पेशल उल्लेख करावे वाटले.
अवांतर :  शिष्ट, आणि स्वत:ला शहाणे, प्रस्थापित म्हणुन मिरवणा-या लोकांचा आम्हालाबी लै राग येतो. अमित, आपला जबरदस्त संयमचा प्रतिसाद आवडला.
 

मूळ गझलेपासून आणि गझल ह्या विषयापासून भरकटलेले सर्व प्रतिसाद, लेखन काढून टाकण्यात येतील. आक्षेपार्ह प्रतिसाद आढळल्यास विश्वस्तांशी निरोपातून संपर्क साधावा. योग्य ती कारवाई करण्यात येईल.


--विश्वस्त